तरुण भारत

कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

हुबळी/प्रतिनिधी

केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही लॉकडाऊन लागू करणे आवश्यक नाही, असे म्हंटले आहे. बुधवारी हुबळी येथे शहरातील पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री जोशी यांनी कोरोनावर मात करण्याचा लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचे म्हंटले. राज्यात १७ एप्रिलनंतर लॉकडाउनची शक्यता नाही. सरकारच्या सूचनेचे पालन करून कोरोनावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने मदत केली पाहिजे. कोरोनाबद्दल जनतेने गंभीर असले पाहिजे, असे ते म्हणाले.

मंत्री जोशी यांनी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आठ दिवसापासून सुरू आहे. सरकार याबाबत बोलण्यास तयार आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर परत यावे. हा संप करण्याची वेळ नाही. जर काही समस्या असेल तर ते वाटाघाटीद्वारे सोडवायला हवे. संपामुळे राज्यातील जनतेला त्रास होत आहे. कर्मचार्‍यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

जारकिहोळी विजयी होण्याच्या भ्रमात
पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री वारंवार बेळगावला येत आहेत, असे कॉंग्रेसचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांनी वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मंत्री जोशी म्हणाले की, कॉंग्रेसच्या उमेदवाराचे विधान बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव येथे केवळ दोनच वेळा प्रचार केला आहे. राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणूक सुरू आहे. सतीश जारकिहोळी विजयी होण्याच्या भ्रमात असल्याचे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट कायम

Abhijeet Shinde

बिग बॉस कन्नड फेम जयश्री रमैयाची नैराश्यातून आत्महत्या ?

Abhijeet Shinde

कर्नाटकात कोणतेही संकट नाही, येडियुरप्पा यांनी चांगले काम केले : पक्षाध्यक्ष नड्डा

Abhijeet Shinde

बेंगळूर: लग्न समारंभात बीबीएमपी मार्शल तैनात

Abhijeet Shinde

केएसआरटीसीची केरळ बस सेवा ‘या’ तारखेपासून होणार पूर्ववत

Abhijeet Shinde

…नंतरच कोरोना कर्फ्यू कालावधी वाढीचा निर्णय घेणार : बोम्माई

Amit Kulkarni
error: Content is protected !!