तरुण भारत

कॅफिन आणि आरोग्य

कॅफिन हे माणसाच्या शरीरात एखाद्या स्टिम्युलंटप्रमाणे काम करते. याबाबत केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, कॅफिनचे थोडेसे प्रमाण जरी मिळाले तरी मेंदू चलाखपणे काम करू लागतो. मात्र अन्य काही संशोधनातून असेही दिसून आले आहे की, कॅफिनमुळे जी तरतरी येते, ती अगदी थोडय़ा वेळासाठीच असते.

  • साधारणपणे दिवसाला 300 मिलीग्रम कॅफिन सुरक्षित मानले गेले आहे. दोन ते तीन कप कॉफीमध्ये एवढे प्रमाण असते. ज्या महिला गर्भवती असतात किंवा गर्भधारणेच्या टप्प्यात असतात, त्यांना कॉफीचे सेवन पूर्णपणे बंद करणे हिताचे ठरते.
  • कॅफिनच्या आहारी गेलेले लोक ते जेव्हा घेत नाही तेव्हा त्यांना विड्रॉवल सिंड्रोमचा सामनाही करावा लागतो. दिवसभरात 300 ग्रमहून अधिक कॅफिन घेणार्या व्यक्तींना चीडचीड, झोप न येणे, भीती वाटणे आणि जुलाब होण्यासारख्याही समस्या उद्भवू शकतात.
  • गेली अनेक वर्षे अशी धारणा होती की, कॉफी किंवा कॅफिनयुक्त अन्य पेये प्यायल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. कारण कॅफिन मूत्रवर्धक असते. मात्र आपले शरीर हे कॅफिनच्या प्रमाणानुसार ऍडजस्ट होते, असे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे कॅफिन घेतल्यावर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज नाही.
  • काही लोक कॅफिनच्या वाटेलाच जात नाहीत.  अशा लोकांना फक्त एक कप चहा किंवा कॉफी घेतल्यावरही त्रास होऊ शकतो. ही अतिसंवेदनशीलता वय, बॉडी मास इंडेक्स अशा बाबींवर अवलंबून असते. सदृढ असंणार्या प्रौढांना दिवसभरात 200 ते 300 मिलीग्रम कॅफिन म्हणजेच दोन कप कॉफी घेतल्याने कसलेच नुकसान होत नाही. मात्र काहींना कॅफिनचे जणू व्यसनच लागलेले असते. दररोज चार कपांहून अधिक कॉफी पित असाल तर मात्र तुम्हाला हे प्रमाण घटविण्याकडे लक्ष द्यावेच लागेल. दररोज 500 ते 600 मिलीग्रम वा त्याहून अधिक कॉफी पिण्यामुळे मांसपेशींचे आकुंचन, हृदयाची स्पंदने वाढणे, चीडचीड, निद्रानाश, भीती वाटणे, बेचैन होणे आणि अपचन यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
  • कॅफिन घेणे पूर्णपणे बंद करणेही सोपे नसते. असे केल्याने डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना होणे अशा समस्या उद्भवू शकतात. हे विड्रॉवल सिंड्रोम नंतर काही दिवसांनी बरे होतात.
  • एक कप म्हणजे 240 मिलीलिटर पेयातील कॅफीनचे प्रमाण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. साधारणतः, एक कप एक्स्प्रेसो कॉफीमध्ये  400 ते 720 मिलीग्रम, चहामध्ये 120 मिलीग्रम, कॉफीमध्ये 120 ते 200 मिलीग्रम, चॉकलेक मिल्क शेक 2 ते 7 मिलीग्रम, डार्क चॉकलेट – 15 ते 35 मिलीग्रम कॅफिन असते.
  • अनेकांना माहीत नसेल; पण चहा जास्त उकळवल्यामुळे कॅफीनचे प्रमाण वाढते. साधारणपणे 1 मिनिट चहा उकळवल्यामुळे 20 मिलीग्रम, 3 मिनिटे उकळल्यास 28 मिलीग्रम आणि पाच मिनिटे उकळल्यास 40 मिलीग्रम कॅफीन निर्माण होते.

Related Stories

मेंदूला नाही म्हातारपण

Omkar B

किडनी विकार आणि कोरोना

Omkar B

जेवणानंतर चहा घेताय

Amit Kulkarni

सोरायसिसच्या अंतरंगात….

Omkar B

उपचार जन्मखुणांवर

Omkar B

डोळे का फडफडतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!