तरुण भारत

सांगली : क्रीडा संकुल येथील कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट

प्रतिनिधी / सांगली

कोरोना संख्या झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहे. शनिवार दि. 17 एप्रिल पासून मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील स्थीर असलेल्या रूग्णांना स्थलांतरीत करून जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे पुढील उपचार सुरू करण्यात यावेत. तसेच सोमवार दि. 19 एप्रिल पासून सर्वसामान्य कोविड बाधितांसाठीही उपचार सुरू करावेत, असे आदेशित करून यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने सेवा म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट देवून पहाणी केली व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी नियुक्त केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध उगाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून आताही अधिक कार्यक्षमतेने सेवा म्हणून काम करावे. आपत्ती कायद्यांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करण्यासाठी नियुक्त आदेश काढले असून त्यांना काम करणे बंधनकारक आहे. कोणीही परस्पर निर्णय घेवू नये. काही समस्या असल्यास ती नोडल अधिकाऱ्यांना सांगावी. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. प्रत्येकाने आपआपले काम समजवून घेवून करावे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे इलेक्ट्रीक कनेक्शन, ऑक्सिजन, औषधे, ॲम्बुलन्स तसेच इतर पायाभूत सुविधांची संबंधित यंत्रणेकडून तपासणी करून कमतरता आहे दूर करत सर्व सोयी-सुविधा सज्ज करण्याचे निर्देश दिले.

Advertisements

Related Stories

सांगली : शिक्षिकेची क्लासमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

मुश्रीफांचा यॉर्कर, चंद्रकांतदादांची गुगली !

Sumit Tambekar

मिरज मेडीकल’च्या सात विद्यार्थिनींना कोरोना

Sumit Tambekar

काँग्रेसच्या इंधन दरवाढ निषेध मोर्चात विश्वजीत कदम सहभागी

Abhijeet Shinde

संजयकाका हमरी तुमरीची भाषा बरी नव्हे – विलासराव जगताप

Sumit Tambekar

धक्कादायक : इस्लामपुरात विनाकारण फिरणारे आठ जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!