तरुण भारत

कोल्हापूर : गडमुडशिंगीत मायलेकीची आत्महत्या

उचगाव / वार्ताहर

पतीबरोबर कौटुंबिक वाद असल्याने माहेरी गडमुडशिंगी ता. करवीर येथे राहत असलेल्या तेजस्विनी किरण मोरे (वय २४) हिने नैराश्येतून मुलगी अक्षरा (वय ३) हिच्यासह विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली.

बुधवारी दि.१४ सकाळी तेजस्विनी घरातुन मुलीसह बेपत्ता झाली होती. गुरुवारी दुपारी वाजता त्या दोघींचा मृतदेह विहीरीत तरंगत असलेला दिसुन आला. गडमुडशिंगी येथील दाजी महादेव गिरुले यांची तेजस्विनी मुलगी आहे. तिचा विवाह चार वर्षापुर्वी वसगडे येथील किरण मोरे यांच्याशी झाला होता. त्यांना तीन वर्षाची अक्षरा उर्फ काव्या नावाची मुलगी होती. मुलगी झाल्यानंतर घरी कौटुंबिक वादाला सुरवात झाली.

Advertisements

त्यातुन दोन वर्षापासुन तेजस्विनी आपल्या मुलीसह गडमुडशिंगी येथे वडिलांकडे राहत होती. न्यायालयात पोटगी दावाही दाखल झाला होता. या सर्व प्रकारामुळे तेजस्विनी नाराज होती. ती मुलगी अक्षराला घेवुन बुधवारी सकाळी साडे अकराला घरातुन कोणासह न सांगता बाहेर पडली. ती रात्री उशीरापर्यत घरी न आल्याने शोधाशोध केली. ती सापडुन न आल्यामुळे गांधीनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान आज दुपारी 3 वाजता त्यांच्या स्वताःच्याच विहीरीत दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. या बाबतची माहीती गांधीनगर पोलीसांना मिळताच घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आणि . रात्री उशीरापर्यत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Abhijeet Shinde

गुटखा जोमात गाव कोमात

Abhijeet Shinde

कोल्हापुरात सोमवारपासून सर्व दूकाने सुरु करणार

Abhijeet Shinde

कोल्हापुरात माध्यमिक शिक्षण अधिकाऱयांच्या त्या आदेशाची होळी

Abhijeet Shinde

पूररेषा, नगर रचना नियमांचे पुनर्विलोकन करा : जलसंपदामंत्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापालिका निवडणूक : आरक्षणाचा दिग्गजांना फटका, शेजारच्या प्रभागावर डोळा !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!