तरुण भारत

संचारबंदीत ही बाजारपेठा गजबजल्या

सकाळच्या वेळेत खरेदीला झाली गर्दी : पोलीसांकडून वाहनधारकांची चौकशी

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर गुरूवारी संचारबंदी लागू झाली. मात्र या संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी असतानादेखील सातारकर नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीला गर्दी केली होती. या नागरिकांना वारंवार पोलिसांकडून सुचना देण्यात येत होत्या.

 जीवनावश्यक वस्तू खरेदीला परवानगी असल्याने गुरूवारी सकाळी बाजारपेठा पुन्हा गजबजलेल्या होत्या. भाजीपाला, फळे तसेच उन्हाळा सुरू असल्याने चटणी करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. या चटणीचे साहित्य खरेदीसाठी शहरातील दुकानात रांगा लागल्या होत्या. यावेळी मास्क घालून प्रवास सुरू असला तरी सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा उडाला होता. नागरिकांची वाढती संख्या बघून पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाली. या वाहनधारकांना थांबवून विचारणा करण्यात येत होती. तसेच विनाकारण फिरणाऱयांना समजही देण्यात येत होती. काही वाहनधारक पोलिसांना बघून पळ काढत होते. तर शासकीय, खाजगी कर्मचारी आपले आयकार्ड दाखवून पोलिसांना सहकार्य करत होते. ही संचारबंदी 1 मे पर्यंत लागू असल्याने नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

पदवीधर मतदार संघात विजय निश्चित : संग्रामसिंह देशमुख

Abhijeet Shinde

125 पैकी 4 व्यावसायिक बाधित

Patil_p

सलग चौदाव्या दिवशी बाधित वाढ 100 च्या खाली

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 283 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 672 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

खा. संभाजीराजेंनी राजधानीतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी साधला संवाद

datta jadhav

पाटबंधारे मेकॅनिकल कॉलनीतील दारे, खिडक्या जाऊ लागल्या चोरीला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!