तरुण भारत

चिकन लॉलीपॉपमध्ये चक्क किडे

हाऊसिंग बोर्ड दवर्ली येथील प्रकार

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

सद्या गोव्यात कोरोनाचा कहर सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर चांगला आहार घ्यावा व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकडे सर्वांचाच कल असते. मात्र, काल रूमडामळ-दवर्ली येथील हाऊसिंग बोर्डमधील एका फास्ट फुडच्या दुकनात खरेदी केलेल्या चिकन लॉलीपॉप मध्ये चक्क किडे आढळून आढळून आल्याने एकच खळबळ माजली.

रूमडामळ-दवर्ली येथील एका व्यक्तीने काल फास्ट फुडच्या दुकानातून चिकन लॉलीपॉपचे पार्सल खरेदी केले. घरी आल्यावर या चिकन लॉलीपॉपला कोमट वास येऊ लागल्याने ते खोलण्यात आले असता, त्यात किडे आढळून आले. चिकन लॉलीपॉपमध्ये चक्क किडे आढळून आल्याने सर्व जण गोंधळून गेले. घर मालकाने त्वरित त्या फास्ट फुडच्या दुकानाला पुन्हा भेट दिली व चिकन लॉलीपॉपमध्ये किडे असल्याचे दुकानमालकाच्या निदर्शनास आणून दिले.

चिकन लॉलीपॉपमध्ये किडे आढळून आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले व या फास्ट फुडच्या दुकानाजवळ लोकांनी गर्दी केली. दुकानमालकाने त्वरित दुकानाचे शटर बंद करून येथून धुम ठोकली. मात्र, या प्रकारामुळे या ठिकाणी संतापाची लाट पसरली होती. हा जनतेच्या जीवाकडे मांडलेला खेळ असून अशी फास्ट फुडची दुकाने कायम स्वरूपी बंद करतानाच दुकानमालकावर कठोर कारवाई अशी मागणी उपस्थितांनी केली.

एका बाजूने लोक कोरोनाकडे संघर्ष करीत असतानाच दुसऱया बाजूने असे कुजके खाद्य पदार्थ पुरवून लोकांना संकटात टाकत असल्यात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या कुटुंबातील सदस्यांनी हे किडे पडलेले चिकन लॉलीपॉप खाल्ले नाही. अन्यथा परिस्थिती आणखीन चिघगळी असती.

सरकारच्या फुड ऍन्ड ड्रग्स खात्याने त्वरित सर्व फास्ट फुडची तपासणी करावी व ज्याच्याकडून नियमाचे पालन होत नाही तसेच शिळे व कुजके खाद्यपदार्थाचीविक्री करतात अशावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Related Stories

दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Omkar B

हरमल येथे 12 लाखाचे ड्रग्ज जप्त

Patil_p

राज्यात 11 ते 14 एप्रिलपर्यंत कोरोना लसीकरण उत्सव

Amit Kulkarni

सुरावलीतील सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडला : ‘आप’कडून निषेध

Patil_p

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Amit Kulkarni

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने

Omkar B
error: Content is protected !!