तरुण भारत

दीड महिन्यापासून समस्या जैसे थे

टिळक चौक बसवाण गल्ली येथील गटारीचे काम संथगतीने

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरातील गटारी अरुंद असल्याने त्या रुंद करण्यास खोदाई करण्यात आली आहे. येथील टिळक चौक बसवाण गल्ली येथील गटार अरुंद असल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गटारी रुंद करून पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यास गटारींची खोदाई करण्यात आली. मात्र, येथील काम पूर्ण करण्याऐवजी ते रखडल्याने व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळय़ात गटारी ओव्हरफ्लो होऊन सर्व सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर टिळक चौक बसवाण गल्लीत गटारीचे बांधकाम करण्याकरिता खोदाई करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक दुसऱया बाजूने वळविण्यात आली.

या ठिकाणी खोदाई करून दीड महिना उलटून गेला तरी येथील काम पूर्ण करण्यास दिरंगाई करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून येथील काम रखडले होते. गेल्या चार दिवसांपूर्वी येथील गटारीवर काँक्रिटीकरण करण्यात आले. जेमतेम पंधरा दिवसांच्या कामाला दोन महिने लावत असल्याने येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

खासगी इस्पितळांना नोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात राजकीय हालचालींना वेग

Patil_p

पोस्टमन चौकातील खड्डय़ांकडे दुर्लक्ष

Patil_p

कारवार जिल्हय़ातील तलावांचा विकास करा

Amit Kulkarni

‘सुहास आर्केड’चे भूमिपूजन उत्साहात

Patil_p

गुजराती नवरात्रोत्सव मंडळाची एक लाखाची मदत

Patil_p
error: Content is protected !!