तरुण भारत

सिंह घराघरात पोहचला, आता मतदानपेटीपर्यंत पोहचवा

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचे आवाहन : सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा : शिवाजीनगर येथे पार पडली जाहीर सभा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेकदा यश व अपयशे पचविली आहेत. पण कधी यशाने हुरळून गेली नाही तर अपयशानेही खचून गेली नाही. समितीचा सिंह बऱयाच वर्षांनी पुन्हा एकदा डरकाळी फोडण्यास तयार झाला आहे. सुरुवातीला ‘हे पोरगं काय करील’ अशी वल्गना केली जात होती. परंतु प्रचारात घेतलेली आघाडी पाहिल्याने दिग्गजांना घाम फुटला आहे. तरुणाईने समितीचा सिंह घराघरात पोहचविला. आता हाच सिंह 17 तारखेला मतदान पेटीपर्यंत पोहचवा, असे आवाहन शिवसेनेचे हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावच्या मतदारांना केले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी शिवाजीनगर येथील शिवाजी चौकात कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या धारदार शैलीने विरोधकांना गारद केले. प्रचारसभेच्या व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सीमावासियांवर कोणताही अन्याय झाला की त्याची पहिली कळ कोल्हापूरकरांना येते. त्यामुळेच एक कोल्हापूरकर म्हणून सिंहाच्या प्रचाराला वाघ दाखल झाला आहे. लोकसभा हे आमचे ध्येय नाही, परंतु आमच्या लढय़ाचा मार्ग आहे. समितीने आजवर कोणत्याही जाती-पातीचे राजकारण केलेले नाही. यामुळेच बहुजन समाज आजवर समितीच्या पाठीशी राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंहाची गर्जना होणारच

या निवडणुकीच्या निमित्ताने सीमालढा आता तरुणाईने आपल्या खांद्यावर घेतला आहे. जेव्हा तरुण एखाद्या आंदोलनात उतरतात तेव्हाच तेथे क्रांती घडते. तरुणाईने आवळलेली हीच वज्रमूठ आपणा सर्वांना निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून द्यायची आहे. रात्र वैऱयाची आहे. प्रत्येकाने डोळय़ात तेल घालून पुढील काही तास काम करायचे आहे. सिंहाचा विजय आता नक्की झाला असून, या सिंहाची गर्जना आपल्याला लवकरच लोकसभेत ऐकायला मिळेल, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

यावेळी पांडुरंग चिगरे, माजी नगरसेविका मिनाक्षी चिगरे, सुनील घोडके, चारुदत्त केरकर, विनायक बावडेकर, संतोष घाटगे, बाळू कदम, अनिल पवार, नारायण बाळेकुंद्री, मनोहर घाटगे, जगदीश जाधव, तानाजी चंदगडकर, पुंडलिक मंडोळकर, जगदीश पुरोहित, संजय सुळगेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने मराठी भाषिक उपस्थित होते.

Related Stories

शहर स्वच्छतेसाठी राबणाऱया यल्लव्वा

Patil_p

नाणारचा रिफायनरी प्रकल्प आम्हांला हवाच!

Patil_p

नवी गल्ली शहापूरचा शुभम शेळकेंना पाठिंबा

Amit Kulkarni

अलारवाड क्रॉस येथे होणार उड्डाणपूल

Patil_p

किमती भेटवस्तू देण्याच्या आमिषाने वृद्धाला 5 लाखाचा गंडा

Patil_p

शिवसेनेतर्फे मास्कचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!