तरुण भारत

ज्येष्ठ सर्वोदयी नेते, माजी आमदार सदाशिवराव भोसले यांचे निधन

बेळगाव : बेळगावचे बापू (गांधी) म्हणून ओळखले जाणारे ज्ये÷ सर्वोदयी नेते, स्वातंत्र्यसैनिक, बेळगावचे पहिले माजी आमदार सदाशिवराव बापूसाहेब भोसले यांचे वयाच्या 101 व्या वषी कचेरी गल्ली, कडोली येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे 5 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, विवाहित मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.

सदाशिवराव यांनी अखेरपर्यंत म. गांधींची तत्त्वे व विनोबा भावे यांचा करुणेचा संदेश यांच्याशी निष्ठा राखली. दोन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. मात्र, 1955 मध्ये महात्मा गांधींच्या कार्यासाठी त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देणारे ते त्या वेळचे पहिले आमदार ठरले. त्यांनी कै. लक्ष्मण होनगेकर, गंगाराम डोंगरे, महादेव आपटेकर, शटगौंडा देसाई, चंद्रम मायाण्णा यांच्या सहकार्याने ग्राम स्वच्छता, दारू बंदीसाठी आंदोलने केली. कडोली परिसरात सर्वोदयी विचारांची पेरणी करून शेतकऱयांत आधुनिक पद्धतीच्या शेतीची आवड निर्माण केली.

Advertisements

रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी गांडूळ शेतीवर भर दिला. नेहमी स्वतःच्या हाताने सूत कातून ते कापड वापरत असत. 

प्रशासनातर्फे प्रांताधिकारी अशोक तेली, तहसीलदार शैलेश परमानंद, तलाठी राणी पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली व भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच ऍड. राम आपटे, मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, रावजी पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे पदाधिकारी, दिलीप सोहने, धर्मादाय खात्याचे तहसीलदार डी. एन. जाधव, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोमवार दि. 19 रोजी सायंकाळी 6 वाजता सदाशिवराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठातील कस्तुरबा बालमंदिरात ही शोकसभा होणार आहे.

Related Stories

पुन्हा निवडणुका घेऊन मुख्यमंत्र्यांनी उदार वृत्ती सिद्ध करावी

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

अनगोळ येथे युवकाची आत्महत्या

Rohan_P

आनंदवाडीतील नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

महाद्वार रोड येथे बेकायदा दारू जप्त

Patil_p

विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!