तरुण भारत

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसींचा तुटवडा

नागरिकांची गैरसोय, लसीकरण मोहीम ठप्प

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारी लसीकरण ठप्प झाले होते. लस घेण्यासाठी आलेल्या अनेक जणांना माघारी जावे लागले. या परिस्थितीला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे लसीकरण वाढविण्याची सूचना राज्य सरकार करीत असतानाच प्रत्यक्षात लसपुरवठा कमी झाला आहे.

जानेवारीपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस देण्यात येत आहे. सरकारच्या मार्गसूचीनुसार लसीकरणाला सुरूवात झाली असून सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत लस घेण्यासाठी सरकारी व खासगी इस्पितळांसमोर गर्दी वाढली आहे.

गुरुवारी लस घेण्यासाठी सिव्हिलला गेलेल्या नागरिकांना धक्का बसला. कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड दोन्ही लसी उपलब्ध नाहीत असे कर्मचाऱयांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना लस घेण्याआधीच तेथून परतावे लागले. त्याची खातरजमा करण्यासाठी तरुण भारतने बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशी संपर्क साधला असता लसींचा साठा संपल्याचे त्यांनी सांगितले.

रोज 150 ते 200 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस दिली जाते. गुरुवारी कमी प्रमाणात पुरवठा झाला होता. त्यामुळे लसीकरणात व्यत्यय झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यात दहा हजारांहून अधिक जणांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस घेतली असून आरोग्य विभागाकडून सिव्हिलला पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरणाला सुरूवात होईल, असे डॉ. विनय दास्तीकोप यांनी सांगितले.

यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता बेळगावसह सात जिल्हय़ांसाठी सरकारने लस पाठविली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत हा साठा बेळगावला पोहोचण्याची शक्मयता आहे. त्यानंतर लसीकरण सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

एकंदर परिस्थिती लक्षात घेता एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वेळेत लस मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने लसींचा पुरवठा व्यवस्थितपणे होतो की नाही यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स खाते द्या

Amit Kulkarni

विधानसभेत आर. एल. जालाप्पा यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

परिवहन कर्मचाऱयांचे निलंबन, बदली प्रक्रिया मागे

Amit Kulkarni

लष्करी जवानाच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

tarunbharat

पोलीस उपायुक्तपदी पी. व्ही. स्नेहा यांची नियुक्ती

Amit Kulkarni

सकाळी गर्दी… सायंकाळी शुकशुकाट

Patil_p
error: Content is protected !!