तरुण भारत

मिरजेत संचारबंदी आदेश मोडणाऱ्या तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी / मिरज

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला असताना विनाकारण मोकाट फिरून आदेशाचा भंग करणाऱ्या तिघांवर मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सलीम इमाम शेख (वय 27, रा. ख्वाजा वसाहत, झोपडपट्टी), सुनील दशरथ ऐवळे (वय 25, रा. बोलवाड रोड, मिरज) आणि ओंकार सुनील पाटील (वय 22, रा. इंदिरानगर) या तिघांचा समावेश आहे.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र संचारबंदी आदेश लागू केला आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचा आदेश दिला आहे. 14 एप्रिल पासून या दोन्ही आदेशांची कडक अमलबंजावणी सुरू आहे. अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावरून फिरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना संबंधित तिघेजण संचारबंदी आणि जमावबंदी आदेश डावलून मोकाट फिरत असताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालया समोर हजर केले असताना न्यायालयाने साथरोग प्रतिबंधक कायदा, राष्ट्रीय आपत्ती कायद्यांतर्गत कलम 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Related Stories

सांगली : बेडग येथे शेतजमिनीच्या वादातून वृध्देचा खून

Abhijeet Shinde

‘त्या’ चिमुकल्याच्या आग्रहाखातर जयंतरावांनी दिली पोझ

Abhijeet Shinde

राजू शेट्टी चालले महाविकास आघाडीपासून दूर

Abhijeet Shinde

राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Abhijeet Shinde

मनपा पोटनिवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार

Sumit Tambekar

कवठेएकंद गावचे सुपुत्र बनले म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!