तरुण भारत

राजकीय नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची बाधा आता राजकीय नेत्यांनाही होऊ लागली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुराप्पा, काँग्रेसचे ज्ये÷ नेते दिग्विजय सिंह, काँग्रेसचे ज्ये÷ नेते रणदीप सुरजेवाला व शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आदी नेत्यांचा कोरोनाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांचा कोरोना अहवाल 9 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. आता ते कोरोनामुक्त झाले असले तरी त्यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Advertisements

दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या सध्या होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाची बाधा झाल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Related Stories

इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा

Patil_p

150 कोटी डोसचा टप्पा पूर्ण

Patil_p

देशात चोवीस तासात 74,383 नवे बाधित

Patil_p

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात मास्कचे उत्पादन

Patil_p

ईपीएफओ वेतनपट: ऑक्टोबर 2020 मध्ये 11.55 लाख वर्गणीदार जोडले

Rohan_P

धन नको केवळ ‘लक्ष्मी’ हवी हुंडय़ाच्या कुप्रथेवर प्रहार

Patil_p
error: Content is protected !!