तरुण भारत

चेन्नई सुपरकिंग्सची ‘सिंह गर्जना’

हंगामातील निचांकी धावसंख्येची पंजाब किंग्सवर नामुष्की

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सने शुक्रवारी आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्स संघावर 6 गडी राखून मात केली आणि या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवला. मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने अवघ्या 13 धावात 4 फलंदाज गारद केल्यानंतर चेन्नईने पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांवर रोखले आणि प्रत्युत्तरात 15.4 षटकात 4 बाद 107 धावांसह विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. पंजाबची 8 बाद 106 ही या हंगामातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.

विजयासाठी 107 धावांचा पाठलाग करताना चेन्नईतर्फे मोईन अलीने 31 चेंडूत 46 तर फॅफ डय़ू प्लेसिसने 33 चेंडूत नाबाद 36 धावा झोडपल्या आणि इथेच धोनीसेनेचा विजय सुनिश्चित झाला. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 66 धावांची भागीदारी साकारली. विजय दृष्टिक्षेपात असताना शमीने सुरेश रैना (8) व अम्बाती रायुडूला (0) 15 व्या षटकात सलग चेंडूंवर बाद केले. पण, तोवर चेन्नईचा विजय निश्चित झाला होता. मोहम्मद शमीने या सामन्यात 21 धावात 2 बळी घेतले.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. हुडा, गो. अर्शदीप 5 (16 चेंडू), फॅफ डय़ू प्लेसिस नाबाद 36 (33 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), मोईन अली झे. शाहरुख, गो. अश्विन 46 (31 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), सुरेश रैना झे. राहुल, गो. शमी 8 (9 चेंडूत 1 चौकार), अम्बाती रायुडू झे. पूरन, गो. शमी 0 (1 चेंडू), सॅम करण नाबाद 5 (4 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 15.4 षटकात 4 बाद 107.

गडी बाद होण्याचा क्रम

(ऋतुराज, 4.6), 2-90 (मोईन, 12.3), 3-99 (रैना, 14.2), 4-99 (रायुडू, 14.3).

गोलंदाजी

शमी 4-0-21-2, झाय रिचर्डसन 3-0-21-0, अर्शदीप सिंग 2-0-7-1, रिले मेरेडिथ 3.4-0-21-0, मुरुगन अश्विन 3-0-32-1.

दीपक चहरचा तिखट मारा ठरला टर्निंग पॉईंट!

चेन्नई सुपरकिंग्सचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने अवघ्या 13 धावातच पंजाबचे 4 फलंदाज गारद केले आणि त्याचा हा तिखट माराच सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. दीपक चहरने मयांक अगरवाल (0), ख्रिस गेल (10), दीपक हुडा  (10) व निकोलस पूरन (0) यांना ड्रेसिंगरुमचा रस्ता दाखवला आणि चेन्नईसाठी विजयाचे दरवाजे सताड उघडले गेले!

धोनीला 200 व्या सामन्यात विजयाची गिफ्ट

महेंद्रसिंग धोनीसाठी चेन्नई सुपरकिंग्सतर्फे हा एकूण 200 वा सामना होता. यात चेन्नईच्या संघसहकाऱयांनी सांघिक खेळ साकारत धोनीला विजयाची गिफ्ट दिली. योगायोगाने या लढतीत नाणेफेकीचा कौल देखील धोनीनेच जिंकला होता.

Related Stories

गोलरक्षक गुरप्रीतमुळे मोठा पराभव टळला

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

पाकला विजयासाठी 93 धावांची गरज

Patil_p

रोहित शर्मा द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून बाहेर

Patil_p

कर्नाटक, पंजाब, पुडुचेरी, चंदीगड, मणिपूर विजयी

Patil_p

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बालेवाडी संकुल सज्ज

Patil_p
error: Content is protected !!