तरुण भारत

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा लाखावर

बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असून शुक्रवारी देखील 14 हजारहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 14,859 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर केवळ 4,031 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील 20 दिवसांतील वाढत्या संसर्गामुळे उपचारातील रुग्णसंख्येने 1 लाखाचा आकडा पार केला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,07,315 इतकी आहे. आरोग्य खात्याच्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 64,01,727 कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 11,24,509 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातील एकूण 10,03,985 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 13,190 रुग्णांचा बळी गेला आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात 1,33,737 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेने अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 11.11 टक्के इतके आहे.

Related Stories

सीसीबीने दोन ड्रग पेडलर्सना केली अटक

Abhijeet Shinde

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Shinde

व्ही. पोन्नराजू मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

Amit Kulkarni

२ हजार किमीच्या प्रवासानंतर विजयी ज्योत बेंगळुरात दाखल

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ

Abhijeet Shinde

बेंगळूर: आरोपी संपतराजची पक्षातून हकालपट्टी करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!