तरुण भारत

काकती सिद्धेश्वर देवस्थानचा इंगळय़ांचा सोहळा अभूतपूर्व

मंदिरात महाभिषेक, धार्मिक कार्यक्रम : शोभागाडय़ांची सवाद्य मिरवणूक : आंबिल-घुगऱयांच्या प्रसादाचे वाटप

वार्ताहर / काकती

Advertisements

येथील सिद्धेश्वर देवस्थानचा इंगळय़ांचा सोहळा शुक्रवार दि. 16 रोजी गाव मर्यादित पार पडला. गुरुवार दि. 15 रोजी सिद्धेश्वर मंदिर येथून सायंकाळी सनई चौघडय़ांच्या निनादात पालखी सोहळय़ाचे आगमन किल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रुद्रपाक देवस्थानात झाले. हिरेमठ स्वामींच्या सान्निध्यात हक्कदार, मानकरी, देवस्थान पंचांच्या उपस्थितीत देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. तेथून देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर देवस्थान अग्निकुंडाच्या पवित्रस्थळी आली. गाऱहाणे घालून पालखीचा मंदिरात प्रवेश झाला.

गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान आंबिल गाडय़ाची घरोघरी सुवासिनींनी आरती केली. सवाद्य मिरवणुकीने प्रथम सांगली सरकारचा गाडा मानाने हक्कदार चौगुले, सनदी यांच्या निवासस्थानातून निघाला तर दोन क्रमांकाचा गाडा देसाई धुळप्पगौडा देशकतीचा, रामगौडा देसाईंच्या घरून निघाला. तीन क्रमांकाचा गाडा कुलकर्णींच्या मानाचा असलेला गवी घराण्याच्या घरातून निघाला. तिन्ही गाडे वतनदारांचे असून या गाडय़ांना प्रथम मान देण्याची ऐतिहासिक परंपरा जपली आहे. क्रमांक चार गवी, सोमाई, टुमरी, बडगुळी, कोचेरी असे हक्काचे गाडे थाटात सहभागी होते.

आंबिल-घुगऱयांचा नैवेद्य देवाला दाखविण्यात आला. मंदिराला सवाद्य प्रदक्षिणा घालून आंबिल-घुगऱयांचा प्रसाद भाविकांना वाटण्यात
आला.

शोभागाडय़ांची मिरवणूक

गुरुवारी रात्री 10.30 वाजता गाडय़ाचे पूजन करून मिरवणुकीला आरंभ झाला. गावातील भावकाई गल्ली, कुरबर गल्ली, होळी गल्ली, मारुती गल्ली आदी शोभागाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रत्येक गल्लीतील गाडय़ापुढे भजनी मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बाराच्या सुमारास शोभागाडय़ांची मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात पोहोचली होती. विधिवतपणे इंगळय़ांची लाकडे प्रज्वलित करण्यात आली. शोभागाडय़ांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून शुक्रवारी सकाळी गाडय़ांची सांगता झाली.

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख हिरेमठ स्वामींचे मठातून सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आगमन झाले. मंदिराच्या दक्षिण प्रांगणातील गदगेवर स्वामी विराजमान झाले.

 देवस्थान पंच, हक्कदार, मानकरी यांच्या उपस्थितीत पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. इंगळय़ांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देवस्थानचा नंदीकोळ, कणबर्गी देवस्थानचा नंदिकोळ,  हक्कदार, मानकरी व भाविकांनी मुहूर्ताच्या घटकेनुसार अग्निकुंडाला प्रदक्षिणा घातली. हा सोहळा भाविकांच्या डोळ्य़ांचे पारणे फेडणारा होता. सहभागी भाविकांनी हर हर सिद्धेश्वराच्या जयघोषात इंगळय़ांतून मार्गक्रमण केले. पहाटेपासून मंदिरात महाभिषेक, दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते.

Related Stories

अल्-मतीन एज्युकेशन ट्रस्टतर्फे लसीकरण शिबिर

Amit Kulkarni

क्रुझरची दोन मोटारसायकलींना धडक

Patil_p

बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघ विजयी

Amit Kulkarni

सामाजिक अंतर राखले नसल्याने डी-मार्टला नोटीस

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Rohan_P

मठ गल्ली येथे महिलेच्या अंगावरील दागिने पळविले

Patil_p
error: Content is protected !!