तरुण भारत

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

शाहूपुरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले असून, शासनालासहकार्य करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन युवा मोरया संस्थेचे अध्यक्ष विक्रांत देशमुख , युवा मोरया सामाजिक संस्थेचे सोशल मीडिया प्रमुख सिध्दार्थ सालीम यांनी केले.    

सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे आरोग्य सेवेवर ताण आला असून नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनानेनियमावली जाहीर केली असून, तीचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. तरीदेखील अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडून संसर्गाचा धोका पत्करत आहेत. कुटुंबातील एक सदस्य बाधित झाल्यास त्याच्यापासून संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होणार आहे. त्यांच्यामार्फत ही संसर्गसाखळी वाढतच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही युवा मोरया सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेे.

Advertisements

Related Stories

साताऱयाच्या एमआयडीसीला चोरटय़ांची साडेसाती

Patil_p

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे

Patil_p

सातारा : पाणी पुरवठा सभापती ऑन फिल्ड

datta jadhav

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेळकाढूपणामुळे क्रीडासंकुलाचे विद्युत कनेक्शन कट

datta jadhav

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Abhijeet Shinde

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी पाटण तालुका हादरला

Patil_p
error: Content is protected !!