तरुण भारत

संघर्ष केला, पण हार नाही मानली

अहमदाबादची पहिली दिव्यांग महिला रिक्षाचालक अंकिता शाह

नोकरीसाठी दारोदार भटकल्यावर करू लागली ड्रायव्हिंग

Advertisements

अंकिता जेव्हा एक वर्षाची होती तेव्हा तिच्या उजव्या पायाला पोलिओ झाला. प्रतिकूल स्थितीतही आईवडिलांनी साथ दिली आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आनंद तिला आहे. तिने अर्थशास्त्रात पदवी मिळविली आहे. 2009 मध्ये कामाच्या शोधात ती अहमदाबाद येथे पोहोचली. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी नकारच मिळाला. काही कंपन्यांमध्ये दिव्यांग असल्याने नाकारण्यात आल्याचे ती सांगते. अंकिताच्या कुटुंबात 7 जण असून त्यांची जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती.

2019 मध्ये अंकिताच्या वडिलांना कर्करोगाची लागलण, तेव्हा तिने कामाच्या शोधार्थ भटकण्याऐवजी स्वतःचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिने एका रिक्षाचालक मित्र लालजी बरोतकडून रिक्षा चालविणे शिकून घेतले. लालजी बरोत स्वतःही दिव्यांग आहेत. त्यांनी कस्टमाइज्ड ऑटोरिक्षा खरेदी करण्यास अंकिताला मदतही केली.

अंकिता रिक्षा चालविण्यासाठी दररोज सकाळी साडेदहा वाजता घरातून बाहेर पडते आणि रात्री 8.30 वाजता घरी पोहोचते. रिक्षाद्वारे ती महिन्याला सुमारे 25 हजार रुपये कमावत आहे.

Related Stories

गलीबॉय, सुपर30 चित्रपटांना मिळणार पुरस्कार 26 चित्रपटांचा होणार गौरव

Omkar B

दिल्लीत सामुहिक संसर्गाची भीती

Patil_p

आंदोलक शेतकरी-सरकारमध्ये आज बैठकीची 11 वी फेरी

datta jadhav

दोषी मुकेशचा तुरुंगात लैंगिक छळ : वकिलांचा दावा

prashant_c

ठाणे, कल्याण डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉक डाऊन

pradnya p

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p
error: Content is protected !!