तरुण भारत

सिद्धार्थच्या जन्मदिनी ‘महासमुद्रम’चे पोस्टर प्रदर्शित

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थने स्वतःचा 42 वा वाढदिवस शनिवारी साजरा केला आहे. सिद्धार्थचे फॅन फॉलोईंग केवळ दाक्षिणात्य राज्यांपुरती मर्यादित नाही. त्याने ‘रंग दे बसंती’ आणि ‘स्ट्रायकर’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले आहे.

त्याच्या वाढदिवसानंतर त्याचा आगामी चित्रपट ‘महामसमुद्रम’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक विशेष भेट दिली आहे. महासमुद्रमचे पोस्टर प्रसारित करण्यात आले असून यात सिद्धार्थचा चित्रपटातील फर्स्ट लुक दिसून येतो.

Advertisements

ए के एंटरटेनमेंटने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्टर प्रसारित करत ‘मनांचा राजा तुमची सर्वांची मने जिंकण्यासाठी परतला आहे’ असे नमूद केले आहे. महासमुद्रम या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय भूपति करत आहे. चित्रपटात अदिती राव हैदरी आणि अनु इमॅन्युएल प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर शर्वानंदही झळकणार आहे. ही एक पेमकथा असून याची निर्मिती रामब्रह्मा सुनकारा करत आहेत. 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी लवेंडर फार्म

Amit Kulkarni

बावरा दिलमध्ये मराठी अभिनेत्री सुमुखी पेंडसे झळकणार

Patil_p

जवानी 20″ च्या निमित्ताने रेश्मा सोनावणे, हरिदास कड पुन्हा एकत्र

Patil_p

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण

Patil_p

‘बिंडा’चे पोस्टर प्रकाशित

prashant_c

रविना टंडनच्या मुलीला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट

Amit Kulkarni
error: Content is protected !!