तरुण भारत

करण जौहरच्या ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिक बाहेर

धर्मा प्रॉडक्शनच्या दोस्ताना 2 या चित्रपटामधून अभिनेता कार्तिक आर्यनला वगळण्यात आले आहे. स्वतःच्या चित्रपटातून कार्तिकला बाहेर काढल्यावर करण जौहर आता मुख्य अभिनेत्याचा शोध घेत आहे. कार्तिकचे वर्तन प्रॉडक्शन हाउसला पसंत नसल्याचे समजते. कार्तिक आर्यनला पटकथेबद्दल अनेक आक्षेप होते. या चित्रपटासाठी आता दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यांची नावे चर्चेत आहेत.

विक्की कौशल आणि राजकुमार राव यांची नावे समोर येत आहेत. विक्की कौशल चित्रपटात एंट्री करू शकतो. विक्कीसोबतची बोलणी फिस्कटल्यास चित्रपटात राजकुमार राव झळकू शकतो.

Advertisements

विक्की कौशलने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला आहे. लवकरच तो चित्रिकरण सुरू करणार आहे. कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो मिस्टर लेले या चित्रपटाचे चित्रिकरण करत होता. चित्रपटाचे 50 टक्के चित्रिकरण मुंबई आणि चंदीगढमध्ये पूर्ण झाले होते.

Related Stories

‘लता भगवान करे’चा ट्रेलर प्रदर्शित

prashant_c

विकी कौशल माधुरीवर फिदा

Omkar B

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Rohan_P

तुझ्यात जीव रंगलाच्या कलाकारांनी घेतली सुलोचनादीदींची भेट

Patil_p

80 वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं आव्हानात्मक : दिलीप प्रभावळकर

Patil_p

कोरोनारुपी युद्धाशी लढण्याची ऊर्जा देणारे गीत

Patil_p
error: Content is protected !!