तरुण भारत

जिल्हय़ात येणाऱयांची रॅपिड टेस्ट!

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : कुडाळ येथे 70 लाखाचा ऑक्सिजन प्लांट उभारणार!

प्रतिनिधी / कणकवली:

Advertisements

जिल्हय़ात कुणीही विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची रॅपीड अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया कोणत्याही आजारासाठीच्या रुग्ण व त्याच्या नातेवाईकांचीही टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुडाळ येथील महिला रुग्णालयात 65 ते 70 लाख खर्चून ऑक्सिजन प्लांट सुरू करत आहोत. आवश्यकता वाटल्यास कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्मयातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचा व कोरोना विषयक माहितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. सामंत म्हणाले, जिल्हय़ात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची चेकनाक्मयावर कोरोना टेस्ट केली जातेय. याखेरीज रुग्णालयांमध्ये दाखल होणारे कोणत्याही प्रकारचे रुग्ण व गर्दी करणाऱया नातेवाईकांची टेस्ट केली जाणार आहे. सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज रेल्वेने स्थानकात आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱयांनी माझी थर्मलगनच्या माध्यमातून तपासणी केली. पालकमंत्री म्हणून वेगळा न्याय दिलेला नाही याचा आपल्याला अभिमान असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

आहारासाठी दरवाढ!

कोविड केअर सेंटरला देण्यात येणाऱया आहारासाठी 120 रुपये दिले जात होते. मात्र, त्यातून सकस आहार देणे शक्य होत नसल्याने आता त्यासाठी 175 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. कणकवली तालुक्यात दहा रुग्णवाहिका असून त्यातील एक बंद आहे. आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेला चालक नव्हता. तोही तातडीने नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कणकवली तालुक्यात 300, देवगडमध्ये 210 व वैभववाडीत 211 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचेही सामंत म्हणाले.

शववाहिनीची तातडीने व्यवस्था!

या मतदारसंघात नगरपंचायतींचे सहकार्य आहे. पण, काही ठिकाणी ग्रामपंचायतींकडून अडचणी येत आहेत. मृत्यू झाल्यास सहकार्य मिळत नाही. यासाठी ग्राम कृतीदल सक्रीय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदारांनाही बैठका घेण्यास सांगितले आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला अंत्यसंस्कारासाठी नेण्याकरिता येणाऱया अडचणीच्या अनुषंगाने उद्यापासूनच वाहनाची व्यवस्था केली जात आहे. तसेच खनिकर्मकडून मिळणाऱया दोन रुग्णवाहिका उपलब्ध होताच जुन्या दोन रुग्णवाहिका शववाहिनी म्हणून वापरण्यात येणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

पंतप्रधान कुठे आहेत, तेही सांगा!

नारायण राणे आणि काही विरोधक मुख्यमंत्री पिंजऱयात बसल्याची टीका करताहेत. पण्, जर मुख्यमंत्री पिंजऱयात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसलेत याचेही उत्तर विरोधकांनी द्यावं. जे आरोप मुख्यमंत्र्यावर होतात तेच आरोप पंतप्रधानांनाही लागू पडतात हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधानांनी कोणत्या उपाययोजना केल्यात त्या जर आम्हाला सांगितल्या तर राज्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे सांगतानाच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधील परिस्थिती पहावी.

यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक अमजुद्दीन मुल्ला, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधुत तावडे, डॉ. सी. एम. शिकलगार, डॉ. सतीश टाक, डॉ. प्रशांत कांदे, प्रशांत बुचडे व इतर उपस्थित होते.

‘सीएस’ची तक्रार होताच कारवाई!

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक हे 48 तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत राहिल्याने त्यांच्यावर निलंबन कारवाई होणारच. परंतु, त्यांच्याकडे शल्यचिकित्सक पदाचा पदभार नसल्याने त्यांनी केबीनमध्ये अतिक्रमण केले. याबाबत विद्यमान शल्य चिकित्सकांनी तक्रार करायला हवी. ती केलेली नाही, तक्रार दाखल होताच त्यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल होईल, असे पालकमंत्री म्हणाले. तर, दिशा समितीत कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाबाबत एकमत झाले असेल तर मला प्रश्न नाही, असेही सांमत यांनी स्पष्ट केले.

रेमडेसिविर लवकरच पूर्ववत!

जिल्हय़ातच नव्हे तर राज्यात आणि देशातही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे ही वस्तुस्थिती आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दोन ते तीन दिवसांत पुरवठा पूर्ववत सुरू होईल, असे सांगितले आहे. तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याचे पालकमंत्री सांमत म्हणाले.

Related Stories

चिपळुणातील उड्डाण पुलास पुढील महिन्यात प्रारंभ!

Patil_p

रत्नागिरी : घरबसल्या युट्यूबव्दारे सोळजाईचे दर्शन

triratna

आरोग्य विभागाच्या भरतीत गोंधळ; काळ्य़ा यादीतील कंपन्यांकडे सूत्रे

Patil_p

माकडतापाचे संकट यंदा गहिरे

NIKHIL_N

चिपळूण : पोलिसांनी जप्त केला देशी-विदेशी मद्य साठा

Shankar_P

खेडमध्ये आणखी एका वीटभट्टी कामगाराचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!