तरुण भारत

बाधितांचा आकडा नियंत्रणाबाहेर

दिवसातील रुग्णसंख्या 2 लाख 34 हजारांवर -1,341 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. शुक्रवारची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आतापर्यंतच्या विक्रमी बाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात 2.34 लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1,341 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 1.23 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यापूर्वी गुरुवारी देशात 2.17 लाख तर बुधवारी 2 लाख 739 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 1 लाख 75 हजार 649 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वषी 15 सप्टेंबरला कोरोनामुळे 1,290 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी 1,341 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. नवे रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱयांची संख्याही वाढत असल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 रुग्ण सक्रिय आहेत.

दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी देशात एकूण 30 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून देशात 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यास प्रारंभ झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला आहे. आतापर्यंत 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

निर्बंध असतानाही संसर्ग झपाटय़ाने

देशभर कोरोनाच्या दुसऱया लाटेचा उदेक झाला असून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनदेखील सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण पडत असून औषधांचा आणि हॉस्पिटलमधील बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. कामानिमित्त इतर राज्यांत गेलेल्या नागरिकांची आपल्या गावी परतण्यासाठी झुंबड उडाली आहे. रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू शकतो. म्हणून रेल्वे प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता.

……….

Related Stories

देशात कोरोना संसर्ग चिंताजनक पातळीवर

Amit Kulkarni

नेपाळचे पंतप्रधान ओली बरळले

Patil_p

राज्याचा अर्थसंकल्पही आता ‘पेपरलेस’

triratna

पुराव्याची जागा घेऊ शकत नाही संशय

Patil_p

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची बाधा; एकाचा मृत्यू

pradnya p

देशभरात बाधितांची संख्या 138

tarunbharat
error: Content is protected !!