तरुण भारत

जिल्हय़ात आणखी पाचजण मृत्युमुखी

दिवसभरातील नवीन पॉझिटिव्ह संख्याही तब्बल सव्वा तिनशे : सतरा दिवसात 27 जणांचा मृत्यू

  • सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 251
  • 76 रुग्णांची प्रकृती चिंताजनक   

प्रतिनिधी / ओरोस:

Advertisements

जिल्हय़ात कोरोना रुग्णवाढीबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात आणखी पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 17 दिवसांत तब्बल 27 जणांचे बळी गेले आहेत. आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या 210 वर पोहोचली आहे. चिंताजनक रुग्णांची संख्याही वाढली असून ती 76 वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्हय़ात आणखी 325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्याही 2251 पर्यंत गेली आहे. कोरोना रुग्ण वाढ आणि मृत्यूही वाढू लागल्याने जिल्हय़ातील चिंता वाढली आहे.

आणखी पाचजणांचा मृत्यू

शनिवारी पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वैभववाडी तालुक्मयातील सरदारवाडी येथील 85 वषीय महिला (त्यांना मधुमेहाचा त्रास होता), सोनाळी येथील 60 वषीय पुरुषाचा, वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील 82 वषीय पुरुषाचा (त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता), कणकवली तालुक्मयातील नांदगाव येथील 75 वषीय पुरुषाचा (त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता) समावेश आहे.

जिल्हय़ात आणखी 325 ‘कोरोना पॉझिटिव्ह’

जिल्हय़ात नव्याने 325 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 566 झाली आहे. दिवसभरात 46 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 7 हजार 099 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 2 हजार 251 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

76 जणांची प्रकृती चिंताजनक

कोरोना रुग्ण वाढ आणि मृत्यूसंख्या वाढीबरोबरच चिंताजनक रुग्णांची संख्या वाढत आहे. 76 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 56 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 20 रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 898, दोडामार्ग – 511, कणकवली –  2602, कुडाळ – 2011, मालवण – 939, सावंतवाडी – 1256, वैभववाडी – 508, वेंगुर्ले – 757, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 54.

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 317, दोडामार्ग -127, कणकवली – 386, कुडाळ – 439, मालवण – 282, सावंतवाडी – 270, वैभववाडी – 272,  वेंगुर्ले – 136, जिल्हय़ाबाहेरील – 22.

तालुकानिहाय मृत्यू : देवगड – 16, दोडामार्ग – पाच, कणकवली – 51, कुडाळ – 38, मालवण – 22, सावंतवाडी – 46, वैभववाडी – 19, वेंगुर्ले – 12, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.

आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने शनिवारी 1056, एकूण 55 हजार 335 पॉझिटिव्ह आलेले नमुने 6,690.

ऍन्टिजेन टेस्ट तपासलेले नमुने : शनिवारी 92, एकूण 32 हजार 589. पैकी पॉझिटिव्ह 2,951.

Related Stories

जिह्यात होम क्वारंटाईनची संख्या वाढतीच!

tarunbharat

नासाडी झालीच…पण आता उभ्या पिकावरच कोंब फुटलेत

Patil_p

रेल्वेतूनही सिंधुदुर्गात मोठय़ा संख्येने प्रवासी दाखल

NIKHIL_N

विनामास्क वावरणारे 7 जणांवर दंडाची कारवाई

Patil_p

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याचे काम निकृष्ट!

NIKHIL_N

अतिधोकादायक ‘वाशिष्ठी’ची ‘हॅमर टेस्ट’ सुरू

Patil_p
error: Content is protected !!