तरुण भारत

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

वृत्तसंस्था/ प्रेटोरिया

पाकच्या क्रिकेट संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात पाकने दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखत पराभव केला. पाकच्या फईम अश्रफला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisements

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर पाक संघाची कामगिरी दर्जेदार झाली असून त्यांनी यापूर्वी वनडे मालिकेतही दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी या दौऱयात टी-20 मालिका हस्तगत केली आहे.

शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकांत सर्वबाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 19.5 षटकांत 7 बाद 149 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात व्हॅन डेर डय़ुसेनने 36 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकारांसह 52, मॅलेनने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33, मार्करेमने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले,. पाकतर्फे अश्रफ आणि हसन अली  यांनी प्रत्येकी 3, रॉफने 2 तर शाहीन आफ्रिदी व मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

पाकच्या डावामध्ये फक्र झमानने 34 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 60, कर्णधार बाबर आझमने 23 चेंडूत 3 चौकारांसह 24, मोहम्मद नवाजने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 25, हाफीजने 12 चेंडूत 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. पाकच्या डावात 10 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे विलीयम्स आणि मॅगेला यांनी प्रत्येकी 2 तर फॉर्च्युन, शम्सी आणि फेलुकेवायो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 19.3 षटकांत सर्वबाद 144 (व्हॅन डेर डय़ुसेन 52, मॅलेन 33, मार्करेम 11, अश्रफ 3-17, हसन अली 3-40, रॉफ 2-18, आफ्रिदी 1-19, नवाज 1-40)

पाक 19.5 षटकांत 7 बाद 149 (फक्र झमान 60, बाबर आझम 24, मोहम्मद नवाज नाबाद 25, हाफीज 10, विलीयम्स 2-39, मॅगेला 2-33, फॉर्च्युन, शम्सी आणि फेलुकेवायो प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

मुस्तफिजूर रहमान पहिल्या दोन लढतीतून बाहेर

Patil_p

स्पेनची मुगुरुझा, मर्टेन्स उपांत्य फेरीत

Patil_p

इंग्लंडच्या आर्चरची दुखापत पुन्हा चिघळली

Patil_p

महान हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे बलबीर सिंग यांचे निधन

Omkar B

डेल स्टीन कँडी टस्कर्समध्ये दाखल

Omkar B

अंकिता रैनाला दुहेरीत प्रथमच डब्ल्यूटीए जेतेपद

Patil_p
error: Content is protected !!