तरुण भारत

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लघंनप्रकरणी चौंघावर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

कोरोना महामारीत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापना सुरु करण्यास बंदी घातली आहे. मात्र, सातारा शहर आणि परिसरात काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्याने सातारा शहर पोलिसांनी चौघांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisements

सातारा येथील गोडोली परिसरातील महेश मोहन ठोंबरे (वय 31, रा. विसावा नाका, सातारा) याचे दि बेकर्स बिस्कीट बेकरी हे दुकान असून ते शुक्रवार, दि. 16 रोजी निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरु होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर बंदोबस्तासाठी असणारे सातारा शहर पोलीस ठाण्यातील पो. कॉ. चेतन ठेपणे यांनी महेश ठोंबरे याच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करत आहेत. सातारा येथील अमर लक्ष्मी, देगाव फाटा येथे अशोक संजय पाटील (वय 24, रा. अमर लक्ष्मी, सातारा) याचे भैय्या मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टस हे दुकान असून ते निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरु होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पो. कॉ. अभय साबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करत आहेत.  विसावा नाका येथे आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. संतोष चंद्रकांत अडसुख (40, रा.खेड, सातारा) याचे विसावा नाका येथे असलेले बिगमार्ट हे दुकान जिल्हाधिकायांच्या आदेशाचे उल्लंघन करुन सुरु होते. ही बाब लक्षात आल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करत आहेत.  जिल्हाधिकायांनी हाडेवेअरची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही रविवार पेठेतील न्यू-झारी मशनरी हे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी दुकान मालक राहील झारी याच्याविरोधात सहाय्यक फौजदार दशरथ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करत आहेत.

Related Stories

सातारा शहरात येणारे सर्व मार्ग होणार सील

datta jadhav

मराठा आरक्षण : उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे दोघांची रणनीती ठरली

triratna

मराठा आरक्षण रद्द झाल्याने राजधानीत तीव्र संताप

datta jadhav

शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

Amit Kulkarni

साताऱ्यात दरोडय़ाच्या गुन्हय़ातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Shankar_P

जिल्हय़ात विविध ठिकाणी अवैध दारु, मटक्यावर छापे

Amit Kulkarni
error: Content is protected !!