तरुण भारत

पाटणमध्ये ‘मनमाड पॅटर्न’ला प्रारंभ

विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांची घेतली ऍन्टिजन टेस्ट

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा जिह्यात कोरोनाचा विस्फोट सुरु असताना नागरिक बेधडकपणे कसेही फिरत आहेत. नियम कोणीही पाळत नाही. त्यामुळे जिह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण घराबाहेर फिरतात. त्यांच्या संपर्कात आलेले पुन्हा बाधित होत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी ‘तरुण भारत’ने सातारा जिह्यात ‘मनमाड पॅटर्न’ची गरज आहे, असे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी आज पाटण शहरात करण्यात आली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांची ऍन्टिजन टेस्ट घेऊन बाधित आलेल्यांची थेट रुग्णालयात रवानगी करण्यात आली. संचारबंदी असताना सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यासाठी अशाच कारवाया जिह्यात सर्वत्र होण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा जिह्यात कोरोनाचा महाविस्फोट सध्या सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन झटत असले तरीही नागरिक प्रशासनाच्या हातावर तुरी देवून मिऱया वाटण्याचे काम करत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर फिरण्यास मुभा आहे. परंतु बाहेर जिह्यात फिरणाऱयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आलेले काही दिवसात बाधित होत आहेत अन् साखळी वाढत चालली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन नवनवीन आराखडे तयार करत आहेत. साखळी तोडण्यासाठी मनमाड येथे जो पॅटर्न राबवण्यात येत आहे तोच पॅटर्न सातारा जिल्हय़ात गरजेचा आहे, अशा आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’ने मांडले होते. त्या वृत्ताची दखल घेत या पॅटर्नची प्रत्यक्ष अंमलबजावणी शनिवारी पाटण शहरात करण्यात आली. हा पॅटर्न राबवण्यासाठी पाटणचे तहसीलदार, पाटणच्या गटविकास अधिकारी, पाटणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांची टीमच दिवसभर शहरातल्या चौकात उभी होती. जे नागरिक मोकाट फिरत आहेत. त्यांची चौकशी न करता थेट त्यांची रॅपीड ऍक्शन टेस्ट करण्यात आली. शहरात अशी कारवाई सात जणांच्यावर करण्यात आली. त्यामुळे ‘तरुण भारत’ने आवाहन करताच पाटणमध्ये हा पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी नियम पाळावेत

लोकांच्या हितासाठीच आम्ही नियमाची अंमलबजावणी करा, असे आवाहन करतो आहे. परंतु नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याने आम्हाला मनमाड पॅटर्न राबवावा लागला. पाटणमधील जर नागरिक मनमानी करणार असतील तर अशा पद्धतीने प्रशासनाच्यावतीने कठोर भूमिका घेतली जाईल त्याकरता नागरिकांनी नियम पाळावेत.

Related Stories

वाहतूक शाखेने मग्रुर व्यापाऱयांना दिला दे धक्का

Patil_p

ट्रक अपहार प्रकरणी सराईतास अटक

triratna

कॅन्सरमुक्त रूग्णांच्या धैर्याला कृष्णा रूग्णालयात सलाम

Patil_p

सातारा पालिकेच्या लेट लतिफांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई

triratna

वाई तालुक्यातील 5 जणांचा मृत्यू

Patil_p

सातारा पालिकेने ‘कागदी’ घोडी नाचवली

Patil_p
error: Content is protected !!