तरुण भारत

ऍपेक्स’ची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल मान्यता रद्द

रत्नागिरी

रत्नागिरीतील ऍपेक्स हॉस्पिटलची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून असलेली मान्यता जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आह़े  मागील काही दिवसांपासून रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींची दखल घेवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Advertisements

जिह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानंतर शहरातील नाचणे येथील ऍपेक्स हॉस्पिटलला डेडीकेटेड कोविड रूग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली होत़ी मात्र या हॉस्पिटलकडून रेमडेसीवीर व प्लाझ्मा थेरपीच्या गैरवापराबाबत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रारी करण्यात आल्य़ा  त्यामुळे या रूग्णालयात केवळ कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवरच उपचार करण्यात येणार आहेत़ ऍपेक्स रूग्णालयाकडून गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यास मनाई करण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून रुग्णालयाला देण्यात आला आह़े

Related Stories

भाजी विक्रेत्यांची आरोग्य तपासणी

NIKHIL_N

शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हाणले चप्पल

Shankar_P

इसिसच्या दहशतवाद्यांचा रत्नागिरी शहरात होता वावर

Patil_p

कोकण किनाऱयावर होणार ‘बीच शॅक्स’

Patil_p

रत्नागिरी तालुका काँग्रेस बैठकीत अंतर्गंत वाद उसळले

Omkar B

6,820 जणांनी घेतली कोरोना लस

NIKHIL_N
error: Content is protected !!