तरुण भारत

रेल्वे बोगद्यात गेलेले पोलीस बालंबाल बचावले!

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर-आंबेडखुर्द येथील रेल्वे बोगद्यामध्ये मृतदेह आणण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी बालंबाल बचावल़े पोलीस कर्मचारी बोगद्यामध्ये असताना वाहतूक बंद ठेवणे अपेक्षित होत़े मात्र कोणतीही कल्पना या कर्मचाऱयांना नसल्याने दैव बलवत्तर म्हणून हे कर्मचारी बचावल़े

Advertisements

मंगला एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱया ममतादेवी भजनलाल (40) व रमा भजनलाल (20) या माय-लेकींचा चालत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होत़ा आंबेडखुर्द बोगद्यामध्ये या महिलांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होत़े संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह एकूण 14 पोलीस कर्मचारी मृतदेह ताब्यात घेणे व पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले होत़े त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही होत़े हे सर्व रेल्वेच्या बोगद्यात असतानाच हा प्रसंग घडला. 

पोलीस पथक रेल्वे बोगद्यामध्ये घटनास्थळापर्यंत जात असतानाच ट्रेनचा आवाज या कर्मचाऱयांच्या कानी पडल़ा लगेचच सर्व कर्मचारी जीवाच्या आकांताने बोगद्याबाहेर धावण्यास सुरुवात केली. रेल्वे येण्याच्या जेमतेम काही सेकंद आधी ते कसेबसे बोगद्याबाहेर पोहोचल़े हे कर्मचारी पुन्हा बोगद्यामध्ये गेले असता काही वेळाने आणखी एक ट्रेन आल्याने पुन्हा एकदा कर्मचाऱयांचा गोंधळ उडाल़ा  ट्रेनची वाहतूक सुरू असल्याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱयांनाही कोणतीही कल्पना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नव्हत़ी सुदैवाने पोलीस कर्मचाऱयांच्या जीवाला या घटनेत कोणतीही हानी झाली नाह़ी गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांनी घेतली आह़े या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे गर्ग यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितल़े

Related Stories

आमदार राणेंकडून डिझेल, वाहन उपलब्ध

NIKHIL_N

याकूब बाबा दर्ग्याचे रुपडे पालटणार

triratna

पोलिओ लसीकरण मोहीम ढकलली पुढे!

Patil_p

सोनुर्ली जत्रोत्सव साध्या पद्धतीने

NIKHIL_N

कोकण मार्गावर सीएसएमटी – मडगाव फेस्टीवलच्या दोन फेऱ्या वाढवल्या

triratna

सिंधुदुर्गात आणखी सात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

NIKHIL_N
error: Content is protected !!