तरुण भारत

पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

2019 मध्ये झाले होते 66.59 टक्के मतदान, पोटनिवणुकीत मतदानाची टक्केवारी 54.02 टक्के असल्याचा अंदाज

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अनेक कारणांनी गाजली. तिरंगी लढत, दोन प्रबळ राष्ट्रीय पक्षांची झुंज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष वेधले गेले होते. शनिवारी सायंकाळी 7 वाजता निवडणूक संपली आणि साधारणपणे 54.02 टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2019 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल 66.59 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी 10 ते 12 टक्क्मयांनी घटली आहे. कोरोनाची धास्ती, उन्हाचा तडाखा, राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवार निवडीवरुन नाराजी आदी कारणांमुळे मतदानांवर परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे. आता लक्ष निकालाकडे असून या निवडणुकीत बाजी कोण मारणार? याचीच उत्सुकता वाढली आहे.

रविवार दि. 2 मे रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. ही मोजणी होईपर्यंत वेगवेगळे आराखडे बांधले जाणार आहेत. मतांच्या टक्केवारीवरुन कोण किती मतांनी विजयी आणि पराभूत होणार याबद्दलच्या चर्चाही रंगल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर 2019 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करता एकूण 66.59 टक्के मतदान झाले होते. त्यापूर्वी झालेल्या 2014 च्या निवडणुकीत 68.25 टक्के मतदान झाल्याची नोंद आढळली आहे. 2021 च्या पोटनिवडणुकीत मात्र 54.02 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिकृत टक्केवारी लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी 46.96 टक्के इतकी होती. अरभावीमध्ये 43.39, गोकाकमध्ये 50.55, बेळगाव उत्तर 41.57, बेळगाव दक्षिण 42.30 तर ग्रामीणमध्ये 55.11 टक्के इतके मतदान झाले होते. बैलहोंगल 46.15, सौंदत्ती 49.92 आणि रामदुर्गमध्ये 46.89 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले होते. मतदानाची वेळ सायंकाळी 7 पर्यंत होती. आपापली कामे उरकून उर्वरित दोन तासांत सर्वच विभागात 2 ते 10 टक्के मतदारांनी मतदान केल्याचे आढळून आले आहे.

सायंकाळी 7 वाजल्यानंतर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली होती. अरभावीमध्ये 55.07, गोकाकमध्ये 60.47, बेळगाव उत्तर 42.88, बेळगाव दक्षिण 44.84, ग्रामीण 58.36 असे मतदान झाल्याचे आढळले. बैलहोंगलमध्ये 58, सौंदत्ती 56.67 तर रामदुर्गमध्ये 55.67 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

बाजारपेठेत महिला पाकिटमारांचा उपद्रव वाढला

Patil_p

सीमाभाग केंद्रशासित करण्याची गरज

Rohan_P

मरगाई चषक क्रिकेट स्पर्धेत सनसेट वारियर्स विजेते

Patil_p

शेततळय़ात पडून मेंढपाळाचा मृत्यू

Patil_p

बिडी येथे शेती उत्पादित मालाच्या खरेदी-विक्री केंद्राची सुरुवात

Patil_p

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे तिळगूळ समारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!