तरुण भारत

दिगास, पंचवाडी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये अपघात, वातावरण तंग

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisements

दिगास, पंचवाडी येथील फोमेंतो खाण कंपनीच्या जेटी रस्त्यावर सकाळी 9 च्या दरम्यान मालवाहू ट्रक व दुचाकी यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार रोहन नरसिंह पार्सेकर जबर जखमी झाल्याची माहिती शिरोडा पोलीस स्थानकातील हवालदार सुधाकर गावकर यांनी दिली. सदर घटनेनंतर लगेच मालवाहतूक रोखण्यात आली व घटनास्थळी वातावरण तंग झाले. त्यात फोंडा पोलीस स्थानकातून जास्त पोलीस यंत्रणा हजर झाल्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर वातावरण दुपारी दीड पर्यंत त्याच स्थितीत होते. त्यामुळे माल भरलेल्या अंदाजे एक हजाराहून जास्त ट्रकांची कापशे ते गुड्डेमळ रस्त्यापर्यंत रांग लागल्याची माहिती मिळाली.

सदर घटनास्थळ फोंडा तालुक्मयाच्या हद्दीत असले, तरी पूर्ण मालवाहतूक सावर्डे व कुडचडे मतदारसंघातून होत आहे. तरी या क्षेत्रांतील कोणताच लोकप्रतिनिधी किंवा कोणतीच यंत्रणा दुपारपर्यंत सदर ठिकाणी का दिसून आली नाही असा प्रश्न उपस्थितांनी उपस्थित केला. तसेच जोपर्यंत सदर ट्रकमालक उपस्थित होत नाही तोपर्यंत मालवाहतूक करू देणार नाही, असा निश्चय स्थानिकांनी केला. सदर घटनेचा पंचनामा हवालदार सुधाकर गावकर यांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार जखमी रोहनला उपचारासाठी मडगाव हॉस्पिसियोमधून बांबोळी येथील गोमेकॉमध्ये हलविण्यात आले आहे.

मर्यादा न पाळता मालवाहतूक

सध्या सावर्डेत व कुडचडेत जी मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे त्याला कोणतीच मर्यादा राहिलेली नाही. यात तळे येथून येणारे ट्रक व कुड्डेगाळ कंपनीतून मालवाहतूक करणारे ट्रक दोन्ही गावच्या लोकांसाठी घातक ठरणार असल्याचा दावा लोकांकडून करण्यात येत आहे. कारण सदर ट्रकांकडून गतीच्या मर्यादेचे पालन होत नाही आणि त्यावर नियंत्रणासाठी ठेवलेली यंत्रणा सुस्त बसून मोबाईल बघण्यात गुंग असते. याअगोदर माल वाहतूक करण्यात येत होती तेव्हा कंपनीतून तासाला सत्तर ते ऐशी ट्रकांतून माल बाहेर काढला जात होता. पण सध्या तासाला कमीत कमी तीनशेहून जास्त ट्रक माल घेऊन निघतात अशी माहिती हाती आली आहे. त्यामुळे कापशे ते गुड्डेमळ फोमेंतो खाण कंपनीपर्यंत रस्त्यावर धावणाऱया मालवाहू ट्रकांमध्ये फक्त दोन ते तीन फुटाचे अंतर आढळून येते. यात सामान्य लोकांना स्वतःचा जीव राखण्यासाठी या ट्रकांच्या पाठीमागे राहून गाडय़ा हाकाव्या लागतात. त्यामुळे त्यांना धूळ पोटात घ्यावी लागते. सावर्डेचे आमदार असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर याबाबतीत कोणतीच हालचाल करताना दिसत नसून त्यांनी याकामी लक्ष घालावे, अशी मागणी सावर्डेतील काही लोकांनी केली आहे.

Related Stories

केरी पंचायत क्षेत्रात संचारबदीला नागरिक, दुकानदारांचा चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा युवक गजाआड

Patil_p

चीनने दिले संकट, आता थर्मल गनची कटकट

Omkar B

पाचव्या दिवशी पेडणेत ट्रक मालक संघटनेचे आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांना न जुमानता मंत्र्यांचे निर्णय

Patil_p

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित

Patil_p
error: Content is protected !!