तरुण भारत

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 2 लाख 61 हजार 500 बाधितांची नोंद झाली. तर 1501 रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांच्या भयावह आकडेवारीबरोबरच मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील संकट अधिक गडद झाल्याचे दिसून येते.

Advertisements

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 77 हजार 150 एवढी आहे. शनिवारी 1,38,423 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 09 हजार 643 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 18 लाख 01 हजार 316 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 जणांना लसीकरण करण्यात आले. 

देशात आतापर्यंत 26 कोटी 65 लाख 38 हजार 416 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 15 लाख 66 हजार 394 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.17) करण्यात आल्या. 

Related Stories

फटाके फोडण्यास केवळ 2 तास मुभा

Patil_p

संघर्ष केला, पण हार नाही मानली

Patil_p

तेलंगणापासून केरळपर्यंत येणार भाजपचे सरकार!

Patil_p

देशातील रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांवर

Patil_p

प्रजासत्ताकदिनी आसाममध्ये स्फोट

Abhijeet Shinde

वर्षअखेरपर्यंत येणार भारतीय लस

Patil_p
error: Content is protected !!