तरुण भारत

सांगली : मार्चअखेर जिल्ह्यात 2109 कोटींचे पीक कर्ज वाटप

दोन लाख 28 हजार शेतकऱयांचा समावेश : 25 बँकांचा समावेश : 81 टक्के उद्दिष्ट पूर्ण

संजय गायकवाड/सांगली

Advertisements

सांगली जिल्ह्यात मार्च 2021 अखेर राष्ट्रीयकृत व खासगी अशा 25 बँकांनी मिळून रब्बी व खरीप हंगामासाठी दोन लाख 28 हजार शेतकऱयांना 2109 कोटीचे पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्जासाठी बँकांना यंदा 2595 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकांनी पीक कर्जाचे जवळपास 81 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

2019 मध्ये  आलेल्या महापुरामध्ये  सांगली जिल्हÎात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. 2020 च्या मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागला. हा लॉकडाऊन जवळजवळ मे 2020 अखेर होता. या दरम्यान इतर घटकांबरोबर शेती व्यवसायालाही मोठा फटका बसला. तरीही केंद्र व राज्य शासनाने शेतकऱयांना पुन्हा उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारी बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप करण्यावर भर दिला. बँकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. जिल्हÎामध्ये राष्ट्रीयकृत, खासगी व व्यापारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती या बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण, या नव्या निर्बंधामधून ज्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यात शेतीचाही समावेश आहे. त्यामुळे शेतकऱयांना पीककर्जाचा मोठा हातभार लागू शकतो.

यंदाच्या वर्षी म्हणजे जिल्हÎात राष्ट्रीयकृत, खासगी व जिल्हा मध्यवर्ती अशा एकूण 25 बँकांना पीक कर्जाचे खरीपसाठी 1497 कोटी तर रब्बीसाठी 1097  कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी खरीपसाठी एक लाख 70 हजार शेतकऱयांना 1387 कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. तर रब्बीसाठी 58 हजार 216 शेतकऱयांना 721 कोटीचे  पीक कर्ज वाटप करण्यात आले. बँकांनी खरीपचे 93 टक्के तर रब्बीचे 66 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पीक कर्ज वाटपात 31 मार्च 2021 अखेर बँकांना 2595 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी दोन लाख 28 हजार शेतकऱयांना 2109 कोटीचे कर्ज वाटप करत बँकांनी 81 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

 जिल्हÎाची अग्रणी बँक या नात्याने बँक ऑफ इंडियाकडून जिल्हÎातील सर्व राष्ट्रीयकृत ,खासगी, व्यापारी व जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपांचा आढावा घेतला जातो. ज्या बँकांकडून उद्दिष्ट पूर्ण होत नाही. त्यांना सुचना दिल्या जातात. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात.व येणाऱया त्रुटी दूर करून जास्तीत जास्त पीककर्ज वाटप करण्यात यावे, असे सांगण्यात येते.

पीक कर्ज वाटपात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन ओव्हसिज बँक, स्टेट बँक, युनियन बँक, युको बँक, ऍक्सीस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रत्नाकर बँक, जिल्हा बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी चांगली आघाडी घेतली आहे.

31 मार्च अखेर जिल्हÎातील प्रमुख  बँकांकडून झालेले पीककर्ज वाटप. आकडे लाखात

बँक ऑफ बडोदा……….13076.

बँक ऑफ इंडिया…………15967.

 बँक ऑफ महाराष्ट्र………..10498.

स्टेट बँक………………………..10156.

युनियन बँक ऑफ इंडिया……….6038.

आयसीआयसीआय बँक……..11884

रत्नाकर बँक…………..1903

जिल्हा बँक……….125485

Related Stories

सांगली : ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडल्यास खबरदार

Abhijeet Shinde

पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सांगलीत घंटानाद

Abhijeet Shinde

सावत्र आई बापाकडुन बालीकेचा खुन, दोघांना अटक

Abhijeet Shinde

सांगलीत कोरोनाने 10 जणांचा मृत्यू , 762 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

शेखर इनामदार कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रभारी

Abhijeet Shinde

कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आणखी दोघांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!