तरुण भारत

सित्सिपस- रूबलेव्ह यांच्यात अंतिम लढत

वृत्तसंस्था/ मोनॅको

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत ग्रीकचा स्टिफेनोस सित्सिपस आणि रशियाचा आंद्रे रूबलेव्ह यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. या दोन्ही टेनिसपटूंना पहिल्यांदाच मास्टर्स टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविण्याची संधी लाभणार आहे.

Advertisements

या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात शनिवारी ग्रीकच्या सित्सिपस ने डॅन इव्हान्सचा 6-2, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत डॅन इव्हान्सने तिसऱया फेरीत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचला पराभवाचा धक्का दिला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात रशियाच्या आठव्या मानांकित रूबलेव्हने नॉर्वेच्या बिगर मानोंकित कास्पर रूडचा 6-3, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत सित्सिपसने गेल्या आठवडाभराच्या कालावधीत एकही सेट गमविलेला नाही.

Related Stories

दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

Patil_p

अमेरिकेच्या सिडनी मॅकलॉघ्लिनचे विश्वविक्रमी सुवर्ण

Patil_p

भारताचे तीन बॉक्सर्स अंतिम फेरीत

Patil_p

नवी निवडणूक प्रकिया राबविण्याचा आदेश

Patil_p

उपांत्य फेरीत कार्लसन, सो यांची विजयी सलामी

Patil_p

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पांड्याचे पुनरागमन

tarunbharat
error: Content is protected !!