तरुण भारत

केडंबेतील महिला आक्रमक, पोलिसांसमोर ठिय्या

वार्ताहर/ केळघर

गुरुवारी ता ( 15 ) केडंबे ता जावली येथे बाल लैगिक आत्याच्यार कायद्या अंतर्गत दाखल झालेल्या गुह्याच्या तपासासाठी आज ( रविवार )आलेल्या  उप विभागीय पोलिस अधिकारी शितल खराडे मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने यांचेसह पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला होता .   पोलिस तपास करत असताना अचानक केडंबे येथील महिला आकृमक होत रस्त्यावर हुज्जत घातत पोलिसांच्या गाडय़ा अडवल्याने तनावाचे वातावरण निर्माण झाले .

Advertisements

 यावेळी ग्रामस्थ व महिलांनी येथील एका महिलेविरद्ध तक्रार देत संबंधित आत्याचाराचा आरोप खोटा असून येथील ग्रामस्थ व युवकांची नाहक चौकशी करू नये अशी मागणी केली .

  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की केडंबे ता जावली येथील 6 वर्षाच्या मुलीवर आत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडय़ांसमोर गावतील महिलांनी ठिय्या मांडला यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी शितल खराडे यांनी जमावाला शांत करत ग्रामस्थ व महिलांचे म्हणणे ऐकुन घेऊन ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्विकारून तपास योग्य प्रकारे करण्याचे आश्वासन दिले सदर देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की चारू कदम हि महिला गेले 4 / 5 वर्षापासुन केडंबे येथील आपल्या भावाच्या घरात राहत असून तिची वर्तनुक चांगली नसुन ती गावातील युवकांना बिघडवण्याचे काम करते तिने वयक्तीक भांडणातून गावातील काही प्रतिष्टीत लोकांना व युवकांसह लहान मुलांना बिघडवण्याचे काम करत आहे तीने जाणिवपूर्वक एका लहान मुलीला व तिच्या आजीला पैशाचे अमिश दाखवुन काही लोकांवर गैर भावनेतून गुन्हा दाखल केला असुन अशा प्रकारचा गुन्हा गावात घडलाच नाही त्यामुळे या महिलेवर कायदेशिर कारवाई करावी व आजपासून गावातील कोणत्याही व्यक्तीला व लहान मुलांना चौकशीसाठी बोलावु नये तसेच गावात दहशतीचे वातावरण असुन आम्हाला शांतपणे जगु द्यावे अशा अशयाचे निवेदन केडंबे येथील महिला व ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शितल खराडे यांना दिले .

चौकट ः केडंबे या गावात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली असुन तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडय़ांसमोर महिलांनी ठिय्या मारल्याने व महिलांचा आक्रमक पणा वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता यावेळी महिलांनी आत्याच्याराचा आरोप खोटा आहे असे म्हणत त्या महिले विरद्ध घोषणा दिल्या यावेळी पोलिस उप विभागीय अधिकारी शितल खराडे यांनी ध्वनी क्षेपकावरून ग्रामस्थ व महिला यांना शांततेचे आवाहन केले .

Related Stories

कराडला कोरोना रूग्णांच्या बेडचा गोलमाल?

Patil_p

चित्रपट महामंडळातील वाद उफाळला!

Patil_p

अनिल परबांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स; अडचणी वाढल्या

Abhijeet Shinde

तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात ; राऊतांची भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर टीका

Abhijeet Shinde

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या : सहकार मंत्री पाटील

Abhijeet Shinde

सातारा : रयत क्रांती संघटनेचा रविवारी शेतकरी मेळावा

datta jadhav
error: Content is protected !!