तरुण भारत

चिपळुणात मच्छी, चिकन, मटण छुपी विक्री!

प्रतिनिधी/ चिपळूण

रविवारी शहरात काही व्यापाऱयांनी चिकन, मटण व मच्छीची छुपी विक्री केली. तसेच किरकोळ प्रमाणात भाजी, फळे विक्रीला ठेवण्यात आली होती. अन्य बाजारपेठ मात्र बंदच होती.

Advertisements

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा सुरू रहात असून अन्य दुकानांना बंदी आहे, तर शनिवार, रविवारी मेडिकल वगळता सर्वांवरच बंदी आहे. त्याची चांगली अंमलबजावणी येथे सुरू आहे. शनिवारी तर कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. मात्र रविवारी सकाळी लवकर काही व्यावसायिकांनी छुप्या पध्दतीने चिकन, मटण, मच्छीची विक्री केली. विशेष म्हणजे बाहेरून मच्छीच्या गाडय़ा शहरात आल्या होत्या. त्यामुळे तपासणी नाक्यावर त्यांना का अडवले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर शहरातील काही भागात किरकोळ भाजी, फळे विक्रीही करताना काही व्यावसायिक दिसून येत होते. मात्र त्यांचीही यंत्रणेने चौकशी न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र अन्य बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. शहरात येणाऱयांची पोलीस कसून चौकशी करीत होते. त्यामुळे तितकेसे नागरिक शहरात दिसून येत नव्हते. सोमवारी मात्र किरणा, भाजीपाला, फळे, परवानगी असलेली दुकाने व कंपन्या सुरू राहणार आहेत. मात्र यातील अनेकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

‘क्वारंटाईन’प्रश्नी प्रशासनाची बेपर्वाई

NIKHIL_N

एसटीचे विलिनीकरण झाल्याशिवाय माघार नाही!

Patil_p

चराठा सरपंच बाळू वाळके यांना मातृशोक

Ganeshprasad Gogate

‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव

Patil_p

सरपंच पद आरक्षण 28 जानेवारी रोजी

NIKHIL_N

रत्नागिरी : वादळापूर्वीच सर्व यंत्रणेला सज्ज रहाण्याच्या सूचना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!