तरुण भारत

कोरोनाचे गांभीर्य ओळखून मास्कचा योग्यरीत्या वापर करा

डॉ. चंद्रकांत शेटय़े यांची माहिती

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisements

सुरुवातीला कोरोना संसर्ग आला तेव्हा त्याची सर्वत्र एकप्रकारची भीती निर्माण झाली. मात्र ती भीती आज आम्हाला पहायला मिळत नाही. आज व्हेक्सीन आले म्हणून कोरोना होणार नाही या विश्वासावर राहू नका. प्रत्येकांनी कोरोनाबाबतची लस घेणे अत्यावश्यक आहे जेणेकरून किडणी, लंग्सना त्याचा मारा बसणार नाही. सर्वांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारची नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. काही लोक मास्कचा वापर तोंडापुरताच करून नाक उघडे ठेवतात. हवेतून कोरोनाचे विषाणू नाकात जाऊ शकतात. सर्वांनी मास्कचा वापर योग्यरीत्या करावा असे आवाहन म्हापसा व्हिजन केअरचे डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना केले.

मृत्यूमुखीची भीती नसल्याने सर्व मोकाट फिरतात

गेल्यावेळी कोरोनाबाबत जी भीती निर्माण झाली होती ती आता आम्हाला पहायला मिळत नाही. यावेळी कोरोनाचे जे रुग्ण वाढले ते खूप मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. कोरोनाबाबत अद्याप लोक गांभीर्याने पाहत नाही. याचे कारण म्हणजे आम्ही मास्क वापरतो, सोशल डिस्टन्स ठेवतो अशी गोष्ट नाही आम्ही या कोरोनावर ताबा ठेवणार तर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे अत्यावश्यक आहे आणि सेनिटायझेशन सुद्धा. बाजारपेठेत लोक कोरोनाचे नियम काहीच पाळत नसल्याचे आढळून आले आहे. कदाचित लोकांना काय वाटते एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोरोनाची लागण होते मात्र गेल्या वेळी कोरोनाची भीती होती लागण झाली तर आम्ही मृत्यूमुखी पडू शकतो बा विचार सर्वांच्या मनात होता मात्र आज ती भीती दूर गेलेली आहे अशी माहिती डॉ. शेटय़े यांनी दिली.

कोरोनाकडे दुर्लक्ष नको

गेल्या वर्षभरापासून लोकांना कोरोना अआहे. लोकांना ह्युमिनीटी डेव्हलोप झालेली आहे. तसे झाल्यास कोरोनाची लागण झाल्यास तेवढे गांभीर्य पहायला मिळत नाही. मृत्युमुखीची संख्या पाहिली तर ती खूप कमी आहे. म्हणून आम्ही कोरोनाकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने सरकारी इस्पितळात खासगी इस्पितळात व्हेक्सीन पुरविली आहे ती प्रत्येकानी घेणे गरजेचे आहे. ती घेतल्यास असे होणार तसे होणार असे आहे खरे बोलायचे झाल्यास लहान मुलांना इंजिक्शन दिल्यावर ताप येणारच व तो दोन दिवस राहतो. हे सर्वांना माहीत आहे व आम्ही तशी तयारीही करतो. तसे या व्हेक्सीनमध्ये ताप येतोच मात्र त्याचा दुष्परिणाम आम्हाला कुठेच आढळून आलेला नाही.

अफवावर विश्वास नको

व्हेक्सीन घेतले म्हणून कोरोना होणार नाही हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अभ्यास अंतर्गत सांगितले आहे. व्हेक्सीन घेऊनही कोरोना झालेला आहे. चुकून झाला तर लंग्स, किडनी खराब होणार नाही. योग्य औषध घेतल्यास माणूस बरा होणार. नाहक अफवावर बळी पडू नका. सर्वांनी ते घेणे गरजेचे आहे. मला कोरोना होणार नाही या विश्वासावर अवलंबून राहू नका. कधीकधी तुमची ह्युमीनीटी बरी असेल मात्र त्याचा त्रास इतरांना होऊ शकतो हे लक्षात घ्या असे डॉ. चंद्रकांत शेटय़े पुढे म्हणाले.

12 वर्षीय मुलगाही मृत्यूमुखी पडला आहे. सर्वांनी कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन मध्ये आम्ही गेल्यास आम्हालाच त्रास सहन करावे लागणार आहेत. कोरोनाचे नियमावली पाळा. हे सरकारने आमच्याच फायद्यासाठी घेतलेले आहे.

कोरोना हा वायरस आहे मास्क वापरणे गरजेचे आहे. काही लोक फक्त तोंडावरच मास्कचा वापर करतात, नाक उघडे ठेवतात. नाकातूनही कोरोना होऊ शकतो जेव्हा एखादा पॉझिटिव्ह माणूस बाजूने गेला तर हवेतूनही विषाणू नाकातून येऊ शकतात याचे भआन सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. वायरस आतमध्ये जाण्याचे तोंड व नाक ही वाट आहे. मास्क वापरतानाही चांगले मास्क वापरणे गरजेचे आहे. काही जण कपडा वापरतात. काहीत नाही त्यात ते तरी याची काळजी सर्वांनी घ्यावी कोरोनाचे गांभीर्य सर्वांनी घ्यावे दक्षता घ्यावी व आपले जीवन सुखमय जगावे असे आवाहन डॉ. शेटय़े यांनी केले.

Related Stories

आज एफसी गोवाची लढत ओडिशाशी

Amit Kulkarni

काणकोण पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ

Omkar B

मडगावच्या विकासासाठी भाजपला संधी द्या

Amit Kulkarni

गणेश बॅन्झोप्लास्टला प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून व्यवसायासाठी हिरवा कंदील

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा डिफेंडर डायलन फॉक्सचा एफसी गोवाशी करार

Amit Kulkarni

कोरोनाचे दोन नवे रुग्ण

Omkar B
error: Content is protected !!