तरुण भारत

माजी विद्यार्थी संघटनेतर्फे लक्ष्मीबाई शहापूरकर यांचा सत्कार

बेळगाव : शिवाजीनगर येथील शाळा क्र. 27 येथील 1980 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने शिक्षिका लक्ष्मीबाई शहापूरकर यांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 41 वर्षांनंतर शिक्षिकेची भेट झाल्यामुळे गप्पाटप्पांचा कार्यक्रम पार पडला. सध्या त्या 81 वर्षांच्या असून शाळेतील कडक शिस्तीच्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी महेश पावले, जोतिबा रेडेकर, अशोक कालकुंद्रीकर, हरिबा पाटील, प्रदीप नेसरीकर, तानाजी चंदगडकर, सुधाकर सुतार, गजानन खराडे, श्रीकांत हन्नूरकर उपस्थित होते.

Related Stories

आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मनपाकडून हालचाली

Patil_p

शैक्षणिक अधोगती रोखण्यासाठी महिला जागृतीची गरज

Patil_p

महाराष्ट्रातील सर्व खासदारांना भेटणार

Amit Kulkarni

नंदगडचा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश

Amit Kulkarni

शहापूर येथे घराला आग

Patil_p

चंदगड तालुक्यात कोरोनाचे नवे तीन रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!