तरुण भारत

बेळगाव बेकर्स सोसायटीतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

प्रतिनिधी / बेळगाव

सहकार क्षेत्रात जुन्या तसेच बेकरी व्यावसायिकांचा मानबिंदू असलेल्या दि बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा 52 वा वर्धापन दिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती असा संयुक्त कार्यक्रम नुकताच ताशिलदार गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंगीरकर होते.

Advertisements

व्यासपीठावर व्हा. चेअरमन राजाराम सूर्यवंशी, संचालक बसवंत गडकरी, शिवाजीराव जाधव, अरुण कणबरकर, विजय पाटील, शंकर पाटील, संचालिका सुरेखा मेलगे, कल्पना पावशे, विनायक सायने आदी उपस्थित होते. प्रारंभी सेक्रेटरी सागर शहापूरकर यांनी स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षांच्या हस्ते केक कापण्यात आला.

चेअरमन शिवाजी हंगीरकर म्हणाले की, बेकर्स सोसायटीने ग्राहकांची उत्तम सेवा करून विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत वर जात आहे. टप्याटप्याने प्रगती साधून बेकर्स सोसायटीने स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. बेळगावातील अनेक मान्यवर व सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱयांनी बेकर्स सोसायटीबद्दल नेहमीच गौरवोद्गार काढले आहेत.

व्हा. चेअरमन सूर्यवंशी म्हणाले, संस्थने 53 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून नीटनेटका व्यवहार, काटकसर, योग्य गुंतवणूक व सर्वांच्या सहकार्याने संस्थेने विक्रमी नफा मिळविला आहे. हे अभिमानास्पद आहे. सभासदांच्या हितासाठी संचालक मंडळ तत्पर आहे.

संस्थेने 3 कोटी रिझर्व्ह फंडाचा टप्पा गाठला

ज्येष्ठ संचालक शिवाजीराव जाधव म्हणाले की, बेकरी व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या सहकार्यासाठी इ. स. 1969 साली संस्थेची स्थापना करण्यात आली. सोसायटीने सभासद व ठेवीदारांच्या हिताच्यादृष्टीने वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेने 3 कोटी रिझर्व्ह फंडाचा टप्पा गाठला आहे. यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा केली. माजी सेक्रेटरी विनायक सायने यांनी आभार मानले.

Related Stories

आज हुतात्म्यांना अभिवादन

Amit Kulkarni

उद्यमबाग, मच्छे-खानापूर परिसरात आज वीजपुरवठा ठप्प

Patil_p

तालुक्यातील सीमेवर तीन चेकपोस्ट

Patil_p

आता अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग…

Patil_p

वडगाव येथील युवकांकडून ऑक्सिजनचा पुरवठा

Amit Kulkarni

व्हीटीयूचा पदवीदान समारंभ 3 एप्रिलला

Amit Kulkarni
error: Content is protected !!