तरुण भारत

शाहूनगरमध्ये अजय तुक्कार यांचा सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल मुख्यमंत्र्यांचे पदक प्राप्त केलेल्या हवालदार अजय उर्फ अप्पू तुक्कार यांचा शाहूनगर येथील मराठा कॉलनी रहिवाशांच्यावतीने हृद्य सत्कार करण्यात आला.

Advertisements

अजय तुक्कार हे येथील कॅम्प पोलीस स्थानकात हवालदार म्हणून सेवा बजावतात. पोलीस ध्वजदिनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते त्यांना मुख्यमंत्रिपदक बहाल करण्यात आले आहे. यावेळी मराठा कॉलनी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश हुक्केरी, उपाध्यक्ष अभिषेक लक्कुंडी, किरण सांगळेकर, जगदीश हिरेमठ, विजय रसाळकर, गंगाधर गाणगेर आदी उपस्थित होते. अजय यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. ते मूळचे हुदली येथील राहणारे असून सध्या मराठा कॉलनी येथे त्यांचे वास्तव्य आहे. आपल्या कॉलनीतील एका रहिवाशाला मुख्यमंत्र्यांचे पदक मिळाल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

Related Stories

रेल्वेस्थानकसमोरील बसस्थानकाचे काम गतिमान होण्याची गरज

Omkar B

खासगी कंपनीच्या बसमधून 50 लाखाची रोकड जप्त

Amit Kulkarni

आता बेळगाव-कराड रेल्वेमार्गाचा व्हावा विचार

Patil_p

प्रगतशील लेखक संघ, एल्गार परिषदेतर्फे कार्यक्रम

Omkar B

हिंडलगा रोडशेजारी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे-दुर्गंधीचे साम्राज्य

Amit Kulkarni

रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई

Rohan_P
error: Content is protected !!