तरुण भारत

देशात बाधितांच्या संख्येत किंचित घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात रविवारच्या तुलनेत सोमवारी बाधितांची संख्या किंचितशी घटली. मागील 24 तासात 2 लाख 59 हजार 170 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1761 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 53 लाख 21 हजार 089 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 80 हजार 530 एवढी आहे. 

Advertisements

सोमवारी 1 लाख 54 हजार 761 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 31 लाख 08 हजार 582 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 20 लाख 31 हजार 977 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 जणांना लस देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 26 कोटी 94 लाख 14 हजार 035 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 15 लाख 19 हजार 486 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.19) करण्यात आल्या. 

Related Stories

महाराष्ट्रात आज दिवसभरात 13,348 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

बागेश्वर : मालाची वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

Rohan_P

सुशीलकुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच : मागील 24 तासात 41,383 नवे रुग्ण; 507 मृत्यू

Rohan_P

कोरोनाचे संकट कायम

Patil_p

कोरोना लसीची ‘स्वदेशी’ मानवी चाचणी सुरू

Patil_p
error: Content is protected !!