तरुण भारत

भारताला अमेरिकेकडून लस निर्मितीचा कच्चा माल मिळेना

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

कोरोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करण्यास अमेरिकेने बंदी घातली आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडीयाने ही निर्यात बंदी उठवून भारताला लसीसाठी लागणारा कच्चा माल द्यावा, अशी विनंती दोन वेळा व्हाईट हाऊसशी संपर्क साधून केली होती. मात्र, व्हाईट हाऊसने यासंदर्भात भारताला कोणताही प्रतिसाद दिला नाही.  

Advertisements

कोरोना संदर्भात नेहमीप्रमाणे व्हाइट हाऊसमध्ये दररोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत भारताकडून कच्च्या मालाच्या निर्यातीबद्दल दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमेरिकेच्या कोविड-19 रिस्पॉन्स टीममधील वरिष्ठ सल्लागार आणि नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजचे संचालक डॉ. अँथनी फॉसी  तसेच डॉ. अँडी स्लेवीट यांनी कोणतीही प्रतिक्रया दिली नाही. ‘मला माफ करा, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. पण याबाबत सध्या माझ्याकडे कोणतंही उत्तर नाही’, असे डॉ. फॉसी यांनी म्हटले आहे.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

काँग्रेसविना संपुआ म्हणजे आत्म्याविना शरीर

Amit Kulkarni

केरळ : आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू

Abhijeet Shinde

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील 719 डॉक्टरांनी गमावला जीव!

Rohan_P

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

पेगासस संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी

datta jadhav
error: Content is protected !!