तरुण भारत

पुण्याच्या धर्तीवर कलानगरीत अभिनयाचे धडे

भालजी पेंढारकर फिल्म ऍन्ड थियेटर ऍकॅडमीतर्फे सर्जनशील लेखन, वाणी कौशल्य, चित्रपट आणि नाट्य अभिनयाचे प्रशिक्षण

कोल्हापूर / अहिल्या परकाळे

Advertisements

मराठी चित्रपट सृष्टीतीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी मराठी चित्रपट निर्मितीला प्रारंभ केला. त्यानंतर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, मास्टर विनायक, बाबुराव पेंढारकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अभूतपूर्व कामगिरी करून कलानगरीचा झेंडा अटकेपार नेण्याचे काम केले. परंतू राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी कोल्हापूर सिनेटोनची तर अक्कासाहेब महाराज यांनी शालीनी सिनेटोनची उभारनी करून चित्रपट सृष्टीच्या वाढीसाठी योगदान दिले. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड बदलत गेल्याने कोल्हापुरचा फोकस पुणे-मुंबईकडे गेला. मराठी, हिंदी मालिकांनी जन्म घेतल्यानंतर कलाकार आणि तंत्रज्ञांची गरज भासू लागली. पुण्या-मुंबईच्या कलाकारांप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांना संधी मिळावी म्हणून 2010-2011 मध्ये भालजी पेंढारकर फिल्म ऍन्ड थियेटर ऍकॅडमीची स्थापना करण्यात आली. गेल्या दशकात आतापर्यंत 100 कलाकार येथून बाहेर पडले असून विविध मालिका, चित्रपटांमध्ये कलाकार, तंत्रज्ञ म्हणून काम करीत आहेत.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी मूकपटाच्या माध्यमातून 1923 साली चित्रपट क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. 63 वर्षे ते चित्रपटसृष्टीट अभिनेते, पटकथाकार, संवाद गीत लेखक, निर्माता, दिग्दर्शक, स्टुडीओ संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जयप्रभा स्टुडीओमध्ये मास्टर विठ्ठल, शाहू मोडक, शांता आपटे, राजा परांजपे, जयशंकर दानवे, शांता हुबळीकर, दादा कोंडके, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, सुलोचना, अनुपमा, आशा काळे, रमेश देव आदी दिग्गज कलाकार घडवले. अलीकडच्या काळात कोल्हापूरच्या चित्रपट सृष्टीला उतरती कळा आली. 1994-95 च्या दशकात स्थापन झालेल्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रांतर्गत सुरू असलेल्या भालजी पेंढारकर फिल्म ऍन्ड थियेटर ऍकॅडमीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात नाटक, चित्रपट, टेलिव्हीजनमध्ये काम करणाऱया कलाकारांना शास्त्रशुध्द पध्दतीने शिक्षण दिले जाते. कोल्हापुरात चित्रपट इंडस्ट्री वाढतेय त्यामुळे कुशल आणि सर्जनशील मनुष्यबळ मिळावे यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

आतापर्यंत 100 विद्यार्थी बाहेर पडले यातील `दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत विशाल गावडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून तर करण पाटील मालिकेतील गण्याची भुमिका करीत आहे. पुण्यातील ललितकला केंद्राचे निकष पूर्ण करीत संकेत भणगे, अमीर शेख, रूचिका खोत यांची निवड झाली आहे. कोल्हापुरातील सर्व नाटÎसंस्थांमध्ये काम करीत आहेत. मुकुंद खुपेरकर स्वत: लघुचित्रपट निर्माण करतात. काहीजण लेखन, सहाय्यक दिग्दर्शन, व्हाईसव्होअर देण्याचे काम करतात. आतापर्यंत रोहित पाटील अभिनेता आनंद काळे, सागर तळाशीकर, शरद भुताडिया, पुणे विभाग नाटÎशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे, गोष्टारंग फेलोशिपचे वैभव लकुर यांनी मार्गदर्शन केले आहे.

चित्रपट आणि नाट्य अभिनय अभ्यासक्रम

कथा, पटकथा संवाद, नृत्य, फाईट टेक्नीक, कॅमेरा टेक्नीक परिचय, लघुपट निर्मितीमध्ये सहभाग, नाटÎ निर्मिती परिचय, चित्रपट निर्मिती परिचय, डबिंग टेक्नीक, इंप्रोव्हायजेशन, विविध अभिनय शैली.

सर्जनशील लेखन, क्रिएटिव्ह रायटिंग अभ्यासक्रम

सर्जनशीललेचे स्वरूप, सर्जनशील लेखनप्रकार, कविता, कादंबरी, नाटक, कथा, पटकथा, लेखनाची प्रक्रिया, सर्जनशील लेखनाचे प्रत्यक्ष प्रयोग, सर्जनशील लेखनाची सर्जनशील लेखनाचे सादरीकरण. गोष्टींची शाळा, वाणी कौशल्य अभ्यासक्रम.

शास्त्रशुध्द पध्दतीने शिक्षण देण्याची गरज

नाटÎशैली, शास्त्रशुध्द पध्दतीने शिक्षण घेवून चित्रपट क्षेत्रात उतरण्याची गरज असते. तसेच नाटÎशैली, अभिनय लेखक, रंगभूमीतील जगभरातल्या परंपरांचा अभ्यास करून चित्रपट इंडस्ट्रीत प्रवेश केला तर पुढील वाटचाल सुखर होते. त्यासाठी नाटÎप्रशिक्षण महत्वाचे आहे. कोल्हापुरात चित्रपट इंडस्ट्री वाढत असल्याने भविष्यात पूर्णवेळ प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डॉ. हिमांशु स्मार्त (समन्वयक, भालजी पेंढारकर फिल्म ऍन्ड थियेटर ऍकॅडमी)फोटो- 18- अहिल्या फोल्डरमध्ये नावाने सेव्ह आहे.

ऍकॅडमीच्या प्रशिक्षणामुळेच अभिनयाचे धडे गिरवीत आहे


मी सावंतवाडी येथील अंबोलीचा रहिवासी आहे. कोल्हापुरात भालजी पेंढारकर फिल्म ऍन्ड थियेटर ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. येथील शिक्षणामुळेच कोल्हापुरात सुरूवातीला गिरीश कर्नाड यांचे है वतन',इश्क मे शहर होना’, कल्लुरीचा रेडीओ', विभाव उपक्रमांतर्गत चांगल्या पुस्तकांचे अभिवाचन करतो. तसेचदख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेमध्ये असिस्टंट प्रोडूसर म्हणून काम करतोय. तसेच याच मालिकेत रक्तभोज आसुराची भुमिकाही करतोय. तसेच कोकणातील लोककला म्हणून ओळख असलेले `दशावतार’ नाटक करतो.

Related Stories

नियम पाळून सोमवारी कोल्हापूर जिल्हातील दुकाने उघडणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गगनबावडा पोलिस ठाण्यात सरदार कोटकरवर सावकारकीचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

प्रभाग रचना करताना घाम फुटणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळमध्ये पीडित महिलेवर जबरदस्ती, दोघांना अटक

Abhijeet Shinde

एक जागा कॉंग्रेसकडे घ्या, निवडूण आणतो

Abhijeet Shinde

बोरपाडळे घाटात स्कोडा कारने पेट घेतल्याने एकाचा जळून मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!