तरुण भारत

मोठी बातमी ! कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू

प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार बुधवारपासून राज्यात पुढील 14 दिवसांसाठी म्हणजेच 4 मे पर्यंत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू (शनिवार, रविवार) असणार आहे. या कालावधीत धार्मिक स्थळे, शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना मात्र, यामधून वगळण्यात आले आहे. दरम्यान, विकेंड कर्फ्यूदिवशी सकाळी 6 ते 10 या कालावधीतच आवश्यक वस्तू खरेदीची मुभा देण्यात आली आहे. सकाळी 10 नंतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी सर्वपक्षीय बैठकीतील सल्ल्यानुसार राज्य सरकारने कठोर नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी मार्गसूची जारी केली. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू तर शनिवार आणि रविवारी कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यभरात जमावबंदी जारी करण्यात आली असून लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. मास्काfशवाय वावरणार्‍यांना 250 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

विकेंड कर्फ्यूदिवशी सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू विक्रीची म्हणजेच डेअरी, फळे-भाजीपाल्याची दुकाने, मांसविक्रीची दुकाने, मेडिकल, धान्यविक्री दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. सर्व प्रकारच्या कंपन्या, कारखाने सुरू राहणार आहेत. बांधकाम आणि बांधकाम कामगारांच्या अनुकूलतेसाठी या क्षेत्राला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे बांधकामे सुरू राहणार आहेत.
सरकारी कार्यालयांमध्येहि 50 टक्के कर्मचार्‍यांना हजर व्हावे लागणार आहे. आंतरराज्य प्रवासाला अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा, मिनी बस, खासगी आणि पाfरवहनच्या बसेस सुरू राहणार आहेत. मात्र, त्यामध्ये 50 टक्के प्रवाशांना मुभा देण्यात आली आहे. विद्यार्क्षी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या ¢ष्टीने शाळा-कॉलेज, प्रशिक्षण केंद्रs बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबवावा लागणार आहे.

सर्वपक्षीय बैठकीत कोरोना नियंत्रणाबाबत चर्चा

राज्यात लॉकडाऊन जारी करावा की नाईट कर्फ्यू, यासंबंधी निर्णय घेण्याकाfरता सरकारने मंगळवारी सायंकाळी व्हिडीओ कॉvफरन्सच्या माध्यमातtन सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. राज्यात कोरोना पाfरस्थतीला राज्य सरकारच कारणीभूत असल्याचा ठपका विरोधी पक्षांनी ठेवला. कुमारस्वामी यांनी 14 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्याचा सल्ला दिला. तर सिद्धराम³या यांनी राज्यात जमावबंदी जारी करून कोरोना नियंत्रणात आणण्याचा पर्याय अवलंबण्याचा सल्ला दिला. बैठकीदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यात शािब्दक चकमक झाली. विधानपाfरषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी संसर्ग अधिक असलेल्या भागात विकेंड लॉकडाऊन जारी करण्याचा सल्ला सरकारला दिला होता.

विरोधी पक्षांचेहि महत्त्वाचे सल्ले

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाÍर्वभूमीवर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षातील नेते, राज्यपालांनी राज्य सरकारला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा सल्ला दिला. तर विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धराम³या यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घ्या, असे सरकारला सूचविले आहे. याच दरम्यान डी. के. शिवकुमार यांनी लॉकडाऊनला आक्षेप घेतला असून राज्य सरकार कोरोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तसेच कोरोना नियंत्रणासंबंधी कठोर नियम जारी करण्याचा सल्ला दिला. कोविड तांत्रिक सल्लागार समितीने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे मंगळवारच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री येडियुराHपा यांच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार सोपविण्यात आला होता.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री येडियुराHपा यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आणि आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत मिळालेल्या सल्ल्यानुसार सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जारी करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.

मार्गदर्शक सूची….
हॉटेल, बार-रेस्टॉरंट बंद, केवळ पार्सलला परवानगी
मॉल, चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जीम, क्रीडा संकुले, मनोरंजन पार्क बंद
धार्मिक स्थळे – मंदिरे, चर्च, मशिदी बंदचे आदेश
शाळा-महाविद्यालये बंद, ऑनलाईन वर्ग घेण्याचा सल्ला
अंत्यविधीसाठी 20, तर विवाहासाठी 50 जणांची उपस्थिती
सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती
सर्व प्रवासी वाहने, बसमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवेश
रुग्णवाहिका, आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीला संमती
बांधकामे सुरू ठेवण्यास संमती
बँका, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये सुरू

Advertisements

Related Stories

लालू प्रसाद यादव यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Rohan_P

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह

Abhijeet Shinde

पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना 1 जुलैपासून व्हिडीओद्वारे धडे

Amit Kulkarni

मराठा आरक्षण कायदा रद्द; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये 13 पिस्तूल, 52 जिवंत काडतुसे जप्त

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यातील शाळा पुन्हा सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!