तरुण भारत

प्रो. फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स क्लब-यूथ मानोरा बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील यूथ क्लब ऑफ मानोरा आणि चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. काल हा सामना नावेलीतील रोझरी मैदानावर खेळविण्यात आला. निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला.

Advertisements

चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबसाठी ऍनफर्ड फर्नांडिस व मायरॉन मेंडीसने तर यूथ क्लब मानोरासाठी ऍनिस्टन फर्नांडिस व स्वीडन बार्बोझाने गोल केले. सामन्याच्या 37व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्स क्लबने गोल करून आघाडी घेतली. हा गोल असिफच्या पासवर ऍनफर्ड फर्नांडिसने केला. दुसऱया सत्रात चर्चिल ब्रदर्स संघाला दुसरा गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र असिफने मारलेला फटका यूथ क्लब मानोराचा गोलरक्षक लुईस बार्रेटोने उधळून लावला.

दुसऱया सत्रात यूथ क्लब ऑफ मानोराने दोन मिनिटात दोन गोल करून चर्चिल ब्रदर्स क्लबवर 2-1 अशी आघाडी घेतली. प्रथम 69व्या मिनिटाला ऍनिस्टन फर्नांडिसने घेतलेली फ्रिकीक चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकाला भेदून सरळ गोलमध्ये गेली. दोन मिनिटानंतर यूथ क्लब ऑफ मानोराने दुसरा गोल केला. यावेळी ऍनिस्टनच्या क्रॉसवर जॉयवीन कार्नेरोचा हेडर गोलच्या आडव्या पट्टीला आदळून परत आला. यावर ताबा मिळवित स्वीडन बार्बोझाने चर्चिल ब्रदर्सच्यागोलरक्षकाला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. शेवटच्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्स क्लबने बरोबरीचा गोल केला. हा गोल मायरॉन मेंडीसने नोंदविला.

Related Stories

कुंभारजुवेत 300 कार्यकर्ते टीएमसीमध्ये

Amit Kulkarni

आमदार रवी नाईक यांच्यातर्फे फोंडय़ात पं. नेहरू जयंती उत्साहात

Patil_p

निरंकाल येथील वानरमारे पक्क्या घरांच्या प्रतिक्षेत

Amit Kulkarni

माईल्सचा काऊन्टर लवकरच ताब्यात

Amit Kulkarni

कथाकथन स्पर्धेत जीव्हीएमच्या सावईवेरे शाळेचे यश

Amit Kulkarni

नव्याबांद, कुंकळ्ळी येथे बस – मोटारसायकल अपघात

Amit Kulkarni
error: Content is protected !!