तरुण भारत

”केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे”

मुंबई \ ऑनलाईन टीम

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने अजूनही फिरवत ठेवले आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला. ते बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अरविंद सावंत म्हणाले की, कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस 19 तारखेला निघाली तरी अजून काल रात्री 24 तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करुन दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही क्रूर आणि कपटनीती आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.

अरविंद सावंत पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरु आहे. हे राजकारण गरिबांच्या जीवाशी खेळणारं आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे. प्राण कंठाशी आले तरी रेल्वेमार्फत ऑक्सिजन पोहोचेल का माहिती नाही. भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते. मात्र, आता आम्ही फक्त 40 टक्केच ऑक्सिजन पुरवू शकतो, असे प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी हे सगळं सुरु आहे.

Related Stories

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात 18 कोरोनाबाधित रुग्णांची भर, एकूण संख्या 100 वर

Abhijeet Shinde

”अशोक चव्हाणांची टीका म्हणजे गिरे तो भी टांग उपर”

Abhijeet Shinde

कांदिवली : एकाच सोसायटीत 17 जणांना कोरोनाची लागण; सोसायटी सील

Rohan_P

ऐन पावसाळय़ात साताऱयावर पाणी टंचाईचे आरिष्ट

Patil_p

मागासवर्गीयांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Amit Kulkarni

कोल्हापूर : टोप येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!