तरुण भारत

कोरोना काळात भारतातून ऑक्सिजनची दुप्पट निर्यात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मात्र, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात भारतातून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट झाल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Advertisements

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान भारतातून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट म्हणजेच 9301 मेट्रिक टन झाली आहे. त्यामधून सरकारने 8.9 कोटी रुपयांची कमाई केली. ही निर्यात अशा वेळी झाली जेव्हा देशातच ऑक्सिजनची कमतरता होती आणि कोरोना संक्रमित प्रकरणांच्या तुलनेत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. भारताने 2019-20 दरम्यान जवळपास 4514 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली होती.

जानेवारी 2020 मध्ये 352 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली. पण जानेवारी 2021 मध्ये ऑक्सिजनची निर्यात वाढून 734 मेट्रिक टन झाली. डिसेंबर 2020 मध्ये  2193 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली. दुसरीकडे डिसेंबर 2029 मध्ये 538 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात झाली होती. 

दरम्यान, ऑक्सिजनची निर्यात एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत दुप्पट झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

Related Stories

मनसे नेते संदीप देशपांडेसह एकूण 4 जणांना अटक

pradnya p

CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

pradnya p

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

Shankar_P

बजेट 2021 : 75 वर्षावरील नागरिकांना आयटी रिटर्न्सपासून मुक्ती

datta jadhav

देशात 47,905 नवे कोरोना रुग्ण; 550 मृत्यू 

pradnya p
error: Content is protected !!