तरुण भारत

ऍपलकडून 5 जी कनेक्टिव्हीटीचा आयपॅड प्रो सादर

भारतासह अन्य देशात होणार उपलब्ध

नवी दिल्ली  ः ऍपल कंपनीचा 20 एप्रिल रोजी रात्री खूप उशिराने स्प्रिंग लोडेड इव्हेंट हा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात 5 जी कनेक्टिव्हीटी असणारा आयपॅड सादर केला आहे. सदर आयपॅडमध्ये ऍपल एम 1 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार आपल्या जुन्या आवृत्तीच्या आयपॅडच्या तुलनेत याचा प्रोसेसर हा 75 टक्क्यांनी अधिक वेगवान असल्याचेही म्हटले आहे.

Advertisements

आयपॅड प्रो हा सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगातील मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध होणार असून यामध्ये 128 जीबी, 256जीबी 512 जीबी, 1 टीबी आणि 2टीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मॉडेलचे प्री बुकिंग हे 30 एप्रिलपासून भारतासह अन्य 31 देशांमध्ये सुरु होणार आहे. तसेच 15 मे नंतर याची डिलिव्हरी सुरु होणार असल्याचीही माहिती दिली आहे.

आयपॅड प्रो मधील फिचर्स

आयपॅड प्रोला 11 इंच आणि 12.9 इंच अशा दोन स्क्रीन आकारात सादर केले आहे. यामध्ये 12.9 इंच मॉडेलमध्ये लिक्विड रेटीना एक्सडीआर मिनी एलइडी डिस्प्ले मिळणार आहे. सदर मॉडेल हे विविध आकारातील राहणार आहेत. स्प्रिंग लोडेड इव्हेंटमध्ये ऍपल कंपनीने 5 जी कनेक्टिव्हीटी असणारे आयपॅड सादर केले असून याची भारतामधील सुरुवातीची किमत ही 71,900  रुपयावर राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

Related Stories

बाटा व्यवसाय विस्तार करणार

Patil_p

वाहन उद्योगाला दररोज 2300 कोटींचा फटका

Omkar B

आरबीआयची पेमेन्ट इंफ्रास्ट्रक्चर फंड उभारणीची घोषणा

Patil_p

प्रवासी वाहन विक्री मार्चमध्ये घटली

Patil_p

9 नोव्हेंबरला ग्लँड फार्माचा आयपीओ

Omkar B

एचडीएफसी बँकेने सीएससी ग्रामीण ई-स्टोअरमधील हिस्सेदारी घेतली

Patil_p
error: Content is protected !!