तरुण भारत

वर्ल्ड अर्थ डे आज

कोरोनाकाळात या दिनाचे अधिकच महत्त्व

जगभरात पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अर्थ डेला अत्यंत अधिक महत्त्व दिले जाते. दरवर्षी 22 एप्रिल रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. यंदा कोविड-19 महामारीच्या प्रकोपादरम्यानही या दिनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मागील काही वर्षांमध्ये अर्थ डे साजरा करण्याची लोकप्रियता वाढली आहे. तसेच दरवर्षी हवामान बदलाचे दुष्परिणाम समोर येत असल्याने याच्या महत्त्वावर अधिक भर देण्यात येत आहे. या दिवशी कोटय़वधी लोक मिळून पृथ्वीशी संबंधित पर्यावरणाची आव्हाने म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि जैववैविध्य संरक्षणासाठी प्रयत्न करण्यात अधिक जागरुक होण्याची संधी असते.

Advertisements

2021 ची थीम

यंदा कोरोना काळात अर्थ डेची थीम पृथ्वीला पुन्हा चांगल्या अवस्थेत आणणे आहे. याकरता नैसर्गिक प्रक्रिया आणि हरित तंत्रज्ञानांवर भर देण्यात येणार आहे. हवामान बदल रोखण्यासाठी ये केवळ निसर्गाला नुकसान पोहोचविणाऱया हालचाली कमी करणेच पुरेसे ठरणार असल्याची धारणा फेटाळण्याची भूमिका या थीममध्ये मांडण्यात आली आहे.

तीन दिवस होणार साजरा

अर्थ डे 1970 सालापासून 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. यंदा याला तीन दिवसांचा कार्यक्रम म्हणून साजरा केले जात आहे. कोविड महामारीमुळे कार्यक्रम डिजिटल स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे. कोविड-19 मुळे पर्यावरणाच्या महत्त्वावरही भर देण्यात येत आहे.

व्हॉट्सऍपचा नवा स्टीकर पॅक

वर्ल्ड अर्थ डेकरता व्हॉट्सऍपने एक नवा स्टीकर पॅक प्रसारित केला आहे. स्टँड अप फॉर अर्थ नावाच्या या पॅकमध्ये काही पर्यावरणसंबंधी आव्हानांना अधोरेखित करण्यात आले आहे. या आव्हानांना आम्ही सर्वजण पूर्ण जगात तोंड देत आहोत. याच्या माध्यमातून कंपनी लोकांमध्ये पुनर्वापर आणि पाणी तसेच वीज वाचविण्याच्या कार्यांवर जोर देऊ पाहत आहे.

Related Stories

अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजल्याचा अघोरी प्रकार उघड

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर

Rohan_P

जागतिक बँकेकडून गरजू देशांसाठी 88 हजार कोटींचा निधी

Omkar B

ओझोनचा थर येतोय पूर्वपदावर; संशोधकांचा दावा

prashant_c

केनियातील अमेरिकेच्या तळावर दहशतवादी हल्ला

Patil_p

देशात ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन राशन’ योजना लागू करावी; , सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!