तरुण भारत

गोवावादी सरकारसाठी फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारांना निवडून द्या

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे आवाहन : अन्यथा मुख्यमंत्र्यांना तो गोव्याच्या विध्वंसाचा कौल वाटणार

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

शुक्रवारी होणाऱया निवडणुकीकडे मतदारांनी केवळ पालिका निवडणूक म्हणून पाहू नये. सध्याच्या गोवाविरोधी सरकारच्या विरोधात गोवावादी शक्तींना एकत्र करून टीम गोवा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे 2022 साली गोव्यात गोवावादी सरकार आणण्यासाठी या निवडणुकीत फातोर्डाच्या मतदारांनी फातोर्डा फॉरवर्डच्या 13 ही उमेदवारांना जिंकून द्यावे, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले.

आपल्या 13 उमेदवारांना घेऊन संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले की, मतविभागणीचा फायदा मिळून जर भाजपचा कुठलाही उमेदवार जिंकून आला, तर भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हा कोळसा वाहतुकीला आणि पर्यावरणाच्या विध्वंसाला दिलेला कौल असे वाटणार आणि त्यांची गोवाविरोधी धोरणे ते अधिक नेटाने मार्गी लावतील हे मतदारांनी ध्यानात ठेवावे.

भाजपची काँग्रेस असंतुष्टांशी हातमिळवणी

मतविभागणी होऊन आमचे उमेदवार पडावेत यासाठी भाजपने काही काँग्रेस असंतुष्टांशी हातमिळवणी केली आहे. यासाठी भाजपने आपल्या स्वतःच्या काही उमेदवारांचाच बळी देण्याचे ठरविले आहे. प्रभाग 11 मध्ये भाजप आपल्या उमेदवाराचा बळी देऊन आंजेलिस पेरेरा यांना निवडून आणू पाहत आहे. त्याच्या बदल्यात आंजेलिस यांनी प्रभाग 9 मध्ये मते फोडण्यासाठी आपला एक उमेदवार उभा केला आहे. प्रभाग 1 मध्ये भाजपने आपला उमेदवार ठेवला असला, तरी त्यांना मासळी मार्केटमध्ये दादागिरी करणाऱया ठेकेदाराला निवडून आणायचे आहे. प्रभाग 8 मध्ये भाजपचे उमेदवार कामिल बार्रेटो हे असले, तरी त्यांच्या भावाची सून प्रभाग 9 मध्ये काँग्रेसची उमेदवार म्हणून उभी आहे. यावरून या निवडणुकीतही आदल्याप्रमाणेच भाजप-काँग्रेस जॉईंट व्हेंचर चालू आहे हे स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला. फातोर्डाच्या मतदारांनी हे जाणून घेऊन चाणाक्षपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपने उभ्या केलेल्या व्हायब्रंट मडगाव पॅनलच्या जाहीरनाम्यावर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे छायाचित्र आहे. मात्र फातोर्डाच्या रस्त्याला आम्ही पर्रीकरांचे नाव द्यायला गेलो होतो तेव्हा याच भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता आणि त्यांना दामू नाईक यांचा पाठिंबा होता हे पर्रीकरप्रेमी मतदारांनी लक्षात ठेवावे, असे सरदेसाई म्हणाले. फातोर्डा फॉरवर्डने अनुभवी, नव्या जोमाचे, भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आणि शिक्षित उमेदवार उभे केले आहेत. मागच्या आठ वर्षांत फातोर्डात जो विकास झाला तो पुढे नेण्यासाठी आणि भविष्यातील फातोर्डा अस्तित्वात आणण्यासाठी या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

Related Stories

भाजपचे मडगाव पालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवार जाहीर

Amit Kulkarni

शिरगावात मंगळवारी देवी लईराईचा लालखी उत्सव

Amit Kulkarni

दहावीच्या परीक्षेसाठी विरोधकांची सकारात्मक भूमिका हवी

Omkar B

नागरिकांनी चिनी वस्तू वापरू नयेत

Omkar B

म्हादईप्रश्नी आपचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni

गोवा डेअरीचे ‘फ्लेवरड् मिल्क’ फुकटात देणे बंद

Patil_p
error: Content is protected !!