तरुण भारत

बुधवारी कोरोनाचे 17 बळी

प्रतिनिधी / पणजी

 गेल्या 24 तासांत (बुधवारी) कोरोनाचे 17 बळी पडले. मंगळवारी गेलेल्या 26 बळींच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी सर्वाधिक नव्याने 1502 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गांचे वाढते सत्र कायम असून 16 बळींमुळे एकूण मृतांचा आकडा वाढून 943 व गेला आहे. एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा 9000 च्या पार गेला असून तो 9300 झाला आहे. संशयितरुग्ण म्हणून 158 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले असून 595 जणांना होम आयसोलशन देण्यात आले आहे. कालच्या दिवसभरात 426 जण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी बळींची संख्या घटल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी नवीन रुग्ण 1502 एवढया मोठय़ा संख्येने वाढल्यमुळे चिंता मात्र कायम आहे.

Advertisements

मडगाव आरोग्य केंद्राचे रुग्ण 1000 च्या उंबरठय़ावर पोहोचले असून 998 झाले आहेत. तर पर्वरी आरोग्य केंद्राचे रुग्ण 782 वर गेले आहेत. कांदोळीचे रुग्णही 771 झाले असून पणजीच्या आरोग्य केंद्राने 661 रुग्ण नोंदविले आहेत. बेतकी -66, कासारवर्णे 52, मये-52, मडकई-86, सांगे-74, या पाच आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी दोन अंकी असून 100 च्या आत आहे.  उर्वरित 28 आरोग्य केद्रांनी कोरोना रुग्णाची तीन अंकी संख्या गाठली आहे. त्यामुळे सर्वच केंद्रातील रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले असून संसर्गांचा वेग दर 38 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 गेल्यावर्षीपासून आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांनी 70,000 चा आकडा पार केला असून त्यांची संख्या 70,814 झाली आहे. तर त्यातील 60,571 जण बरे झाल्याची  माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

 विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे

डिचोली-190, सांखळी-306, पेडणे-202, वाळपई 120 म्हापसा-567, पणजीö616, हळदोणा- 174, बेतकी-66, कंदोळी-771, कासारवर्णे-52 कोलवाळ-177, खोर्ली-157, चिंबल-288, शिवोली-262, पर्वरी 782, मये 52, कुडचडे-147, काणकोण-121, मडगाव-998, वास्को-567, बाळ्ळी-135, कासावली-297, चिंचिणी-128, कुठ्ठाळी-531, कुडतरी- 163, लोटली-150, मडकई-86, केपे-110, सांगे-74, शिरोडा-137, धारबांदोडा-105, फोंडा-587, नावेली-161.

Related Stories

मोबाईल खेचून नेणाऱयाला पकडले तीन मोबाईल, दुचाकी जप्त

Omkar B

वीज खांबांवरील पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे हटवले

Amit Kulkarni

मास्क, सॅनिटायझर, डेटॉलवर कोटय़वधींची उलाढाल

Patil_p

वास्कोत दोन कार्यालये फोडून लाखभराची रोख लंपास

Omkar B

गोवा डेअरीतील अन्य प्रकरणांचीही सहकार निबंधकांनी दखल घ्यावी

Amit Kulkarni

सरकार संजीवनीसंबंधी कोणतेच पाऊल उचलणार नाही

Patil_p
error: Content is protected !!