तरुण भारत

स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्याचा निर्णय

वेळेत अहवाल उपलब्ध करून देण्याची सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाचा फैलाव थोपविण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर निदान झाले तर फैलाव थोपविता येणार आहे. म्हणून बेळगावात स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बुधवारी प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिस्वास यांच्या उपस्थितीत नेहरुनगर येथील आयसीएमआरच्या कार्यालयात अधिकाऱयांची बैठक झाली. आरोग्य विभाग, एनआयटीएमचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. स्वॅबचे नमुने तपासणीसाठी अन्य राज्यांना पाठविण्यापेक्षा बिम्स व एनआयटीएममध्येच तपासणी करावी. त्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना प्रादेशिक आयुक्तांनी केली आहे.

सध्या रोज सहा हजार जणांचे स्वॅब घेतले जात आहेत. बिम्स व एनआयटीएम या दोन प्रयोगशाळेत 3 हजार स्वॅब तपासणी केली जाते. उर्वरित 3 हजार स्वॅब परजिल्हय़ात पाठविण्यात येतात. प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या सूचनेवरून बिम्स व एनआयटीएम या दोन प्रयोगशाळेत यापुढे स्वॅब तपासणी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य देण्याचा व सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिले आहे. यावेळी आयसीएमआरचे संचालक डॉ. चट्टोपाध्याय यांनी आपल्या प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बालकृष्ण तुक्कार, एनआयटीएमचे वैज्ञानिक बन्नाप्पा आदी उपस्थित होते.

Related Stories

शनिवार-रविवारी असणार विकेंड लॉकडाऊन

Amit Kulkarni

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

पेटीबंद उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

Patil_p

शुक्रवारी 15 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे दिव्यांगांना सायकल वाटप

Patil_p

कारवार येथे चोरीप्रकरणी तिघांना अटक

Omkar B
error: Content is protected !!